मराठी समुदाय
Marathi Samuday
Tuesday, 4 April 2023
Tuesday, 28 March 2023
हरिकेन रिव्ह्यू
दुसऱ्या महायुध्दात ३०३ स्क्वाड्रन ने घातलेला धुमाकूळ सर्वज्ञात आहे. पोलिश (पोलंड) फायटर्स नी २९८ जर्मन विमाने पाडली. ब्रिटनचा पाडाव होणे जवळपास नक्की होते त्या परिस्थितीत मित्र राष्ट्राला मदत करणे. रशियन युद्धाला मदत करणे. हरिकेन चा जबरदस्त वापर करत युद्ध कसे जिंकले आणि एवढे करूनही विजय परेड मध्ये रशिया, ब्रिटन, भारत यांचा समावेश केला पण पोलिश सेनेला निमंत्रण दिले नाही याचे शल्यही या सिनेमात दाखवले आहे. सिनेमात काहीही खोटे वाटत नाही हेच यश आहे. नक्की पहा. 👍
Saturday, 31 October 2020
Statue of Unity, Kevdia Marathi vlog
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त
हा मराठी vlog मी सादर करत आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान Statue of Unity
ला भेट दिली होती. अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ आहे.
आज राष्ट्रीय एकता दिवस आहे आणि सरदार पटेल हे राष्ट्रीय एकतेचे प्रतिक
आहेत. त्यांच्या स्मृतीस्थळाचा हा vlog जरूर पहा आणि केवडिया ला
नक्की भेट द्या. धन्यवाद.
National
Unity Day or Rashtriya Ekta Diwas is celebrated to mark the birth
anniversary of Sardar Vallabhbhai Patel on October 31 every year. On the
occasion of National Unity Day and birth anniversary of Sardar
Vallabhbhai Patel, I am releasing my updated Statue of Unity Vlog.
Please watch and share the vlog. Thanks
Link - https://youtu.be/pqT11bcMTbI
Tuesday, 18 February 2014
एम.सी.ए. पदव्युत्तर पदवी
एम.सी.ए. (Master of Computer Application) ही पदव्युत्तर पदवी
संगणक अभियांत्रीकी क्षेत्रातली अग्रणी अशी पदवी आहे. जिथे सर्वच क्षेत्रातील
पदवीधारक प्रवेश मिळवू शकतात. या पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम अशारीतीने तयार
करण्यात आला आहे की सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या पदवीला प्रवेश घेता येवू
शकेल. व्यवस्थापन, गणित आणि संगणकशास्त्र या तीनही विषयांचा पदवीच्या अभ्यासक्रमात
समावेश आहे. विशेषतः व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक विषय या पदवीला शिकता येत
असल्यामुळे या पदवीची उपयुक्तता वाढते. देशातील अनेक विद्यापीठे एम.सी.ए. ही पदवी
प्रदान करतात. मुंबई विद्यापीठाची एम.सी.ए. पदवी ही तीन वर्षाची (सहा सेमिस्टर)
पदवी आहे. शेवटचे सेमिस्टर हे प्रोजेक्ट वर्क साठी राखीव असते. याचा फायदा मुलांना
होतो. कंपनीमध्ये काम कोणत्या स्वरूपाचे असते याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो.
अभ्यासक्रम आणि उपयुक्तता
एम.सी.ए. या कोर्स मध्ये पी.एच.पी., सी.प्लस.प्लस, जावा, डॉट नेट, टेस्टिंग, जी.आय.एस., मोबाईल टेक्नोलॉजी, कॉम्पुटर ग्राफिक्स, मल्टिमीडिया, ईबिसिनेस, सी.आर.एम., डेटाबेस कन्सेप्ट या व इतर अनेक नवीन विषयांचा समावेश होतो. करिअरच्या दृष्टीने ही पदवी उपयोगी ठरते. अनेक क्षेत्रांमध्ये करीअर करता येवू शकतो. बँकिंग, संगणक प्रणाली, सरकारी नोकरी, टेस्टिंग, व्यवस्थापन क्षेत्र, संगणक व्यवसाय, वेब डिझाईन या इतर अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण होतात.

प्रवेश परीक्षा आणि पात्रता
गेल्यावर्षीपासून थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरु झाला आहे. थेट
दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळविण्यासाठी बी.सी.ए., बी.एस्सी (संगणकशास्त्र)
ही पदवी
असणे आवश्यक आहे. बी.कॉम. किंवा अन्य कोर्सचे विद्यार्थी प्रथमवर्ष
एम.सी.ए. ला
प्रवेश घेवू शकतात. दोन्ही प्रकारच्या प्रवेशासाठी १२वी किंवा पदवीला गणित
हा विषय
असणे आवश्यक आहे. एम.सी.ए. या कोर्सला प्रवेश मिळण्यासाठी पदवी परीक्षेत
खुल्या गटासाठी साठी ५० टक्के तर राखीव गटासाठी ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक
आहे. एम.सी.ए.
कोर्सला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
डी.टी.ई. महाराष्ट्र
एम.सी.ए. प्रवेश परीक्षा आयोजित करते. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असते.
या
परीक्षेत दोन पेपर प्रत्येकी १०० गुणांचे असतात. पेपर पहिला सामान्य चाचणी
(४५
मिनिटे) तर पेपर दुसरा पायाभूत संगणक ज्ञान (४५ मिनिटे). प्रत्येक पेपर
मध्ये २५
प्रश्न समाविष्ट असतात. प्रत्येक अचूक उत्तराला ४ गुण दिले जातात. चुकीच्या
उत्तरासाठी एक गुण कमी केला जातो. एखाद्या प्रश्नाच उत्तर दिल नाही तर
शून्य गुण
मिळतात. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी सदर प्रवेश परीक्षा ३० मार्च २०१४
रोजी
घेतली जाणार आहे.
अर्ज कसा करावा
अर्ज कसा करावा
ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असते तसेच या परीक्षेचा अर्जही ऑनलाईन
करावा लागतो. १० ते २४ फेब्रुवारी दरम्यान विद्यार्थी http://www.dtemaharashtra.gov.in/mca2014
या संकेतस्थळावर
जावून ऑनलाईन अर्ज करू शकतात. संकेतस्थळावर खाते खोलल्यावर युजरनेम आणि पासवर्ड कायम
लक्षात ठेवण गरजेच आहे. या युजरनेम आणि पासवर्डचा उपयोग भविष्यात होणार आहे. सदर संकेतस्थळावरून डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंगचा
वापर करून फी देखील भरता येते किंवा चलन प्रिंट करून एक्सिस बैंकच्या जवळच्या शाखेत पैसे
भरता येतात. ७ एप्रिलला या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. आवश्यक कागदपत्र छाननी १४
मे ते २३ मे २०१४ या काळात ए.आर.सी. मधे होईल.
त्यानंतर ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरणे आवश्यक असते.
अंतिम दिनांक - २४ फेब्रुवारी २०१४
संपर्कासाठी पत्ता -
अंतिम दिनांक - २४ फेब्रुवारी २०१४
संपर्कासाठी पत्ता -
DIRECTORATE OF TECHNICAL EDUCATION Maharashtra State
3, Mahapalika Marg, Opp. Metro Cinema, Dhobi Talao,
Post Box No. 1967, Mumbai-400001
Helpline: 022-30233444/445/446
Telephone: 022-22641150, 22641151
Fax: 022-22692102, 22690007
E-Mail: desk2a@dte.org.in
-
प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर
Friday, 25 January 2013
लिंगायत धर्म - मानवतावादी महान धर्म
लिंगायत धर्म - मानवतावादी महान धर्म
मी माझ्या मागच्या लेखात भगवान बसवेश्वर आणि त्यांच्या कार्याची ओळख करून दिली होती. भारत देश हा अनेक संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान, विचारधारा यांना सामावून घेणारा एक विशाल देश आहे. याच महान परंपरेत भगवान बसवेश्वर यांच नाव येत. १२ शतकात बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. बसवेश्वरांचा उद्देश फार स्पष्ट होता. रुढी आणि परंपरेच्या जोखडात अडकलेल्या समजाला मार्ग दाखवण. स्त्री - पुरुष समानता निर्माण करण. जातीयवाद नष्ट करण. समाजात समानता प्रस्थापित करण. जन्मधीष्टीत वर्चस्ववादाला रोखण. सामाजिक समता हाच बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा होता.
लिंगायत धर्मामध्ये सर्व समान आहेत. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. जो शिकेल तो सन्मान प्राप्त करेल, अशी साधी शिकवण आहे. कोणीही लिंगायत होवू शकतो. लिंगायत धर्म स्वीकारू शकतो. त्याची जात आणि धर्म महत्वाचा नाही. 'इष्टलिंग दीक्षा' प्राप्त करून लिंगायत धर्म स्वीकारला जावू शकतो. जे जन्मापासूनच लिंगायत असतात त्यांना वयाच्या १२-१३ वर्षी 'इष्टलिंग दीक्षा' दिली जाते.
लिंगायत धर्मामध्ये 'अनुभव मंडप' ही सर्वोच्च संसद आहे. ही संसद लोकशाही देशातील संसदीय प्रणाली सारखीच असते. विद्वान लोक ज्यांना लिंगायत धर्माच्या विचारांचे योग्य ज्ञान असते त्यांना सदस्य केले जाते. हे सदस्य समाजातील कोणत्याही थरातील असू शकतात. गरीब - श्रीमंत हा भेद इथे नाही. लिंगायत धर्म वर्णव्यवस्थेला नाकारतो. बसवेश्वर वर्णव्यवस्था नाकारताना सांगतात की ती मानवनिर्मित आहे. ईश्वराने निर्माण केलेली नाही.
बसवेश्वरांचा मार्ग खडतर होता. त्यांनी सुरु केलेली धर्मसुधारणा जातीयवादी कट्टर धर्मांधांना अजिबात आवडली नव्हती. बसवेश्वर सर्व जातींना समान वागणूक द्यायचे हे कट्टरवादी धर्मधुरीणांना खटकले. बसवेश्वरांच्या पुढाकाराने आंतरजातीय विवाहांना सुरुवात झाली. पहिला आंतरजातीय विवाह झाला. शरण मधुवारस आणि शरण हरलाय्या या दोन कुटुंबात पहिल्या प्रथम बसवेश्वरांनी रोटी बेटी व्यवहार घडवून आणला. ह्या प्रकारने सनातनी चिडले. त्यांनी राजाकडे बसवेश्वरांची तक्रार केली. बसवेश्वरांना शिक्षा म्हणून बिदर सोडण्याचा आदेश देण्यात आला. शिक्षा म्हणून मधुवारस, हर्लाय्या आणि शीलवंता (वधू) ह्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. तिघांचे डोळे काढून घेण्यात आले. पाय हत्तीच्या पायांना बांधून फरपटत नेण्यात आल. हाल हाल करण्यात आले. पण ह्या तिघांच बलिदान वाया नाही गेल. बसवेश्वरांनी सनातनी लोकांविरुद्ध आपला लढा चालूच ठेवला.
१२ व्या शतकात उदारमतवादी विचार भारतभूमीला देणारे बसवेश्वर हे श्रेष्ठ संत ठरतात. 'मनुष्याची योग्यता जन्मावर आधारीत नसून, केवळ चांगले चरित्र, गुण आणि शिक्षण माणसाला श्रेष्ठ बनवत' हे त्यांचे विचार भारताच्या भविष्यातील वाटचालीत उपयोगी ठरतील. समाजातील प्रत्येक व्यक्ती एकसमान आहे. स्त्री पूरुष भेद निरर्थक आहे. हे विचार आजही लागू होतात. बसवेश्वरांनी दाखवलेला मार्ग आज अनेकजण विसरले आहे. अज्ञानही आहे. आजही जातीयवाद आहे, आजही स्त्रीला समान हक्क मिळत नाहीत. स्त्रीने चूल मूल सांभाळावे या विचाराचे अनेकजण आहेत. निरर्थक रुढी-परंपरा आणि अंधश्रद्धा आजही आहेत. या आधुनिक काळातही १२ व्या शतकातील बसवेश्वरांच्या विचारांची गरज आहे.
धन्यवाद - वामन परुळेकर

Labels:
धर्म,
धर्मसुधारणा,
लिंगायत
Subscribe to:
Posts (Atom)