ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा
जेथे मिळे धरेला, आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रवीबिंब टेकलेले
जेथे खुळया ढगांनी, रंगीन साज ल्यावा
स्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला, मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा, स्वप्नीच वेध घ्यावा
--- शांता शेळके
2 comments:
शांताबाईंची गीतकविता अजरामर तर आहेच. पण ही जीवनवाटेचे निदर्शक आहे.
-------------------------------------------
ब्लागकर्ते मी माझी कविताही पाठवीत आहे.
------------------------------------
जपतो आहोत आपण किती वर्षांचे सोशिकपण
अथकपणे जाणूनबुजून झालो त्यात रममाण
जगणे, आयुष्य हे शब्द त्याचेच प्रतीक झाले
ठेचकाळले पाय तरी चालणे भाग झाले
उद्रेक हा भावनांचा मनात चालतो रोज
आनंद तयाचा ऐसा मानणे भाग झाले
- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर,
ताळगाव गोवा
प्रकाशजी तुम्ही फार छान कविता करता. येथे पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद.
Post a Comment