Friday, 29 February 2008
अर्थसंकल्प २००८
अर्थसंकल्प २००८ मध्ये सरकारने शिक्षणावरचा एकूण खर्च २०% नी वाढवला आहे तर आरोग्यावरील खर्च १५% नी वाढवला आहे. अर्थसंकल्प २००८ चे ठळक वैशिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रासाठी ३४ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वीज वितरणासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निवडणुका डोळयासमोर ठेवून लोकप्रिय अर्थसंकल्प देण्याचा हा प्रयत्न आहे.
ठळक वैशिष्टये आणि आरक्षित निधी --
> माहिती तंत्रज्ञान विभाग - १६०० कोटी
> राष्ट्रीय महामार्ग योजनेसाठी १२९७० कोटी
> ग्रामीण आरोग्य सेवांसाठी १२०५० कोटी
> पोलिओशी लढण्यासाठी १०४२ कोटी
> शिक्षण - ३४४०० कोटी
> भारत निर्माणसाठी ३१२८० कोटी
> सर्व शिक्षा अभियान - १३ हजार १०० कोटी
> ईशान्य भारतासाठी १४५५ कोटी
> महिलाकल्याण मंत्रालयासाठी ७२०० कोटी
Labels:
माझा भारत
आजचा विचार
आजचा विचार
तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता ती मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न करा, अन्यथा कधीकधी मिळेल त्यावर प्रेम करण्याची वेळ येते.
- एक अज्ञात विचारवंत
तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता ती मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न करा, अन्यथा कधीकधी मिळेल त्यावर प्रेम करण्याची वेळ येते.
- एक अज्ञात विचारवंत
Labels:
आजचा सुविचार
Thursday, 28 February 2008
माहितीपर संकेतस्थळे भाग - ३
माहितीपर संकेतस्थळे भाग - ३
मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देणार आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील तिसरे पुष्प आहे..
शोध संकेतस्थळे.
तुमच्या ब्लॉगची वाचकसंख्या वाढवायची असेल,तर तुमचा ब्लॉग नावाजलेल्या सर्च संकेतस्थळावर दिसणे महत्त्वाचे ठरते. यासाठी ब्लॉग नावाजलेल्या सर्च संकेतस्थळांवर जमा (सबमीट) करावा लागतो. कोणतेही सर्च इंजिन, तुमचा ब्लॉग त्यांच्या शोध यादीत येइल याची हमी देत नाही. आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग या शोध यादीत समाविष्ट करण्यासाठी ही शोध संकेतस्थळे विविध मोजमापे वापरतात. उदा. आपले वाचक किती? आपल्या लिंकचा दर्जा, लिखाणाचा दर्जा. अर्थात प्रत्येक शोध संकेतस्थळाचे नियम वेगवेगळे आहेत. सर्वात यशस्वी शोध संकेतस्थळ गुगल प्रत्येक संकेतस्थळ अथवा ब्लॉगला दर्जा प्रदान करते. ज्याची रॅंक जास्त वरची त्याचे लिस्टींग प्रथम होते.
सर्वात महात्त्वाचे हे की ही शोध संकेतस्थळे आपला ब्लॉग शोध यादीत येइल याची हमी देत नाहीत आणि शक्यतो नेहमीच्या वापराचा ई-मेल जमा (सबमीट) करु नका. एकदा ई-मेल जमा झाला की इन् बॉक्स जाहीरातींनी भरुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खाली काही प्रमुख शोध संकेतस्थळांची थेट लिंक मी आपल्याला उपलब्ध करुन देत आहे. त्यांचा वापर करुन पहा.
१) गुगलवर आपला ब्लॉग जमा करा.
येथे URL च्या समोरील चौकोनात तुमचा पुर्ण ब्लॉग पत्ता लिहा.
उदा. http://marathisamuday.blogspot.com/
( जेथे marathisamuday ऐवजी तुमच्या ब्लॉगचे नाव येइल. )
२) स्र्कुब द वेबवर आपला ब्लॉग जमा करा.

येथे आपल्याला आपला ई-मेल द्यावा लागेल. (शक्यतो नेहमीच्या वापराचा ई-मेल जमा (सबमीट) करु नका)
३) जायदेवर आपला ब्लॉग जमा करा.

४) याहू वर आपला ब्लॉग जमा करा.
जगातील प्रमुख शोध संकेतस्थळापैकी एक याहू संकेतस्थळ जलद शोधासाठी प्रसिध्द आहे. याहूची रचना अत्यंत सोपी आहे. ई-मेलची गरज नाही.

- वामन परुळेकर

Wednesday, 27 February 2008
मराठी भाषा दिन
जेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने आज मराठी भाषा दिन साजरा होत आहे. मराठी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
या निमित्ताने मी मागे लिहिलेला लेख पुर्नप्रकाशित करत आहे.
आज सकाळी एका ब्लॉगवर वाचले की आपली मराठी भाषा आता संपत चालली आहे. रोज वर्तमानपत्रातही अशाच बातम्या छापून येतात. कधी कुठल्यातरी शहरात विचारवंत एकत्र बसून मराठीवर विचारमंथन करतात. रोज हे असच चालु आहे. खरच मराठी संपणार आहे का? मला विचाराल तर मुळीच नाही. नकारार्थी विचार करत बसुन चालणार नाही.
आपण सर्व मराठी बांधवांनी ठरवल तर मराठी कशी संपेल ?आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो , पणआपण किती मराठी बोलतो? किती मराठी भाषिक चित्रपट, मालिका पहातो? किती मराठी पुस्तके वाचतो ? सुरुवात आपल्यापासुनच केली पाहिजे.
आणखी महत्त्वाच म्हणजे आपल्याला महिती असेलच की इंग्रजी एवढी लोकप्रिय का आहे ? कारण ती सर्वसमावेषक भाषा आहे. मी कुठतरी वाचल आहे की त्या भाषेत ७०% ईतर भाषेतील शब्द आहेत. आपल्यालाहीमराठी भाषा व्यापक करावी लागेल. याच्यावर तज्ञांनी जरुर विचार करावा.
या निमित्ताने मी मागे लिहिलेला लेख पुर्नप्रकाशित करत आहे.
मराठी भाषा संकटात? |
आज सकाळी एका ब्लॉगवर वाचले की आपली मराठी भाषा आता संपत चालली आहे. रोज वर्तमानपत्रातही अशाच बातम्या छापून येतात. कधी कुठल्यातरी शहरात विचारवंत एकत्र बसून मराठीवर विचारमंथन करतात. रोज हे असच चालु आहे. खरच मराठी संपणार आहे का? मला विचाराल तर मुळीच नाही. नकारार्थी विचार करत बसुन चालणार नाही.
आपण सर्व मराठी बांधवांनी ठरवल तर मराठी कशी संपेल ?आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो , पणआपण किती मराठी बोलतो? किती मराठी भाषिक चित्रपट, मालिका पहातो? किती मराठी पुस्तके वाचतो ? सुरुवात आपल्यापासुनच केली पाहिजे.
आणखी महत्त्वाच म्हणजे आपल्याला महिती असेलच की इंग्रजी एवढी लोकप्रिय का आहे ? कारण ती सर्वसमावेषक भाषा आहे. मी कुठतरी वाचल आहे की त्या भाषेत ७०% ईतर भाषेतील शब्द आहेत. आपल्यालाहीमराठी भाषा व्यापक करावी लागेल. याच्यावर तज्ञांनी जरुर विचार करावा.
Tuesday, 26 February 2008
देशप्रेमी लियांडर पेस
सच्चा देशप्रेमी लियांडर पेस
तो ज्यावेळी मैदानात असतो त्यावेळी प्रत्येक क्षणाला भारताचे प्रतिनिधित्व

ह्या सगळयाचा उल्लेख करायचे महत्त्वाचे कारण म्हणजे सद्या भारतीय टेनिस क्षेत्रात उद् भवलेला वाद. खेळाडुंचा म्हणे लियांडरवरचा विश्वास उडालाय. या खेळाडुंना लियांडर कप्तान म्हणून नको आहे. तो हुकूमशाह सारखा वागतो असे या सहखेळाडूंना वाटते.
खर तर हा वैयक्तीक स्वरुपाचा वाद असावा पण त्यात पेस वर करण्यात आलेले आरोप निषेधास पात्र आहेत. क़तार या अरब राष्ट्रात झालेल्या आशियाई खेळात पेसने सुवर्ण पदक जिंकले होते, त्यावेळी झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत चालू झाल्यावर पेसच्या डोळयातून ओघळलेले आनंदाश्रु देश कधीच विसरणार नाही. देशासाठी जिवाचे रान करुन खेळणाऱ्या या महान टेनिसपटूवर असे आरोप फक्त आपल्याच देशात होउ शकतात.
डेव्हिसकप असो वा दोहा आशियाई खेळ पेसची जिद्द आणि देशप्रेम अतुलनिय आहे. अशा या महान भारतिय व्यक्तिस माझा सलाम.
आगे बढो पेस हम तुम्हारे साथ है
Labels:
माझा भारत
उदंड झाले मेळावे.
उदंड झाले मेळावे.
आजकाल शेतकरी मेळाव्यांचे जबरदस्त पीक आले आहे. सर्व राजकिय पक्ष आणि संघटना शेतकरी मेळावे घेत आहेत. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना वारेमाप आश्वासने दिली जातात.विविध पॅकेजची घोषणा करण्यात येते. शेतकऱ्यांसाठीच्या विविध आकर्षक योजना या मेळाव्यांमध्ये मांडण्यात येतात.पण खरेच हे सर्व सत्यात उतरते का? आश्वासने कितपत पाळली जातात ? या सर्व मेळाव्यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्यात का? मित्रांनो शेतकरी हा आपल्या सर्वांचा खऱ्या अर्थाने अन्नदाता आहे. हा अन्नदाता जर कमजोर झाला तर काय होइल याचा विचार करा.
मी मांडलेल्या प्रश्नांबाबत आपल्याला काय वाटते? आपले विचार जरुर मांडा.
Monday, 25 February 2008
आजचा दिवस
आजचा दिवस सर्व मराठी भाषिकांसाठी महत्त्वाचा आहे.
आजच्याच दिवशी १८४० साली मराठीतील बाल साहित्याचे जनक आणि प्रख्यात लेखक विनायक ओक यांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी १५१० साली गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात गेले होते.
आज जे आपण बालसाहित्य वाचतो त्याचे मराठीतील आद्य जनक विनायक ओक होते.

दिनविशेष
स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे (भाग-२)
जन्म - २३ जुलै,१८५६ | मृत्यू - १ ऑगस्ट, १९२० |
स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा करणारे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.
टिळकांनी बंगालच्या फाळणीविरूद्धचा लढा,होमरूल चळवळ,लखनौ करार यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. केसरी , मराठा सारखी वृत्तपत्रे स्वातंत्र्य लढयात महत्त्वपूर्ण ठरली.
टिळकांना साहित्यातही रुची होती त्यांनी लिहीलेली ग्रंथसंपदा.
>आर्यांचे मूळ वसतीस्थान
>ओरायन
>गीतारहस्य
>वेदांचा काळ
Labels:
स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे
स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे (भाग-१)
महात्मा मोहनदास करमचंद गांधी
![]() |
(image source--http://media.radiosai.org/) |
जन्म - ऑक्टोबर २, १८६९ | मृत्यू - जानेवारी ३०, १९४८ |
महात्मांचा जन्म ऑक्टोबर २, १८६९ या दिवशी गुजरात राज्यातील पोरबंदर शहरात झाला होता. गांधींनी इंग्लंडला कायद्याचा अभ्यास करुन बॅरिस्टर ही पदवी मिळवली. दक्षिण आफ्रीकेत त्यांनी वर्णव्देषा विरुध्द दिर्घकालीन लढा दिला.
भारतात परतल्यावर ते स्वातंत्र्य लढयात सक्रीय झाले. मिठ सत्याग्रह, दांडी यात्रा, विदेशी हटाव, स्वदेशी जागरण, भारत झोडो ही ऎतीहासिक आंदोलने बापुंनी उभारली. भारतात असलेल्या अस्पृश्यता निवारणा साठी त्यांनी प्रयत्न केले.
महात्मा गांधी हे ज्या महात्मा या उपाधीने ओळखले जात ती उपाधी त्यांना रविंद्रनाथ टागोरांनी दिली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले. जानेवारी ३०, १९४८ ला नथुराम गोडसे या व्यक्तीने महात्मा गांधींची गोळ्या घालुन हत्या केली. आणि संपूर्ण भारत दुःखाच्या महासागरात लोटला गेला.....
Labels:
स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे
मराठी संत साहित्य आणि संत परिचय (भाग-३)
पसायदान आतां विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावे । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १७९४ ॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ १७९५ ॥ दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ १७९६ ॥ वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ १७९७ ॥ चलां कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ १७९८ ॥ चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ १७९९ ॥ किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १८०० ॥ आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ १८०१ ॥ तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ १८०२ ॥ संत ज्ञानेश्वर भावार्थदीपिका, अध्याय १८ |
Labels:
संत साहित्य
मराठी संत साहित्य आणि संत परिचय (भाग- २)
मराठी संत साहित्य आणि संत परिचय (भाग- २)
या सदराची सुरुवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांपासुन करुया.
संत ज्ञानेश्वर
जन्म : १२७५ | समाधी : १२९६ |
लिहिलेले ग्रंथ-----
>भावार्थदीपिका - ज्ञानेश्वरी
>ज्ञानेश्वर हरिपाठ
>चांगदेव पासष्टी
>अमृतानुभव
वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.
Labels:
संत साहित्य
मराठी संत साहित्य आणि संत परिचय (भाग- १)
मराठी संत साहित्य आणि संत परिचय (भाग- १)
हे सदर माझ्या पत्निने यापुर्वी ऑरकुटवर सुरु केले होते. आता मी ते सदर तिच्या परवानगीने या ब्लॉगवर सुरु करत आहे.
आपल्या महाराष्ट्राला हजारो वर्षांची संत परंपरा लाभली आहे. या संत परंपरेत अनेक संतांनी श्रेष्ठ संत साहित्य निर्माण केल. अध्यात्म सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहचविण्याच थोर कार्य संतांनी केल.
या संत परंपरेत निर्माण झालेल्या संत साहित्याची ओळख आपल्या नव्या पिढीला व्हावी म्हणून हे सदर सुरु केले आहे.

Sunday, 24 February 2008
ओल्ड गोआ चर्च
ओल्ड गोआ चर्च, ओल्ड गोआ, पणजी
माझ्या आवडत्या चर्च पैकी एक असे हे चर्च. येथील शांतता आणि विशालता जरुर अनुभवावी. जेव्हा जेव्हा शक्य होते तेव्हा मी या चर्चला भेट देतो. हे ठिकाण पणजीतून फार जवळ आहे. पणजी-मंगेशी रोडवर उजव्या बाजुला हे चर्च दिसेल.
Labels:
गोआ,
छायाचित्रे,
पर्यटन,
माझा भारत
मराठी समुदाय ब्लॉग पुर्ननिर्माण प्रक्रियेत

मराठी समुदाय ब्लॉग पुर्ननिर्माण प्रक्रियेत आहे. उद्या मराठीसमुदाय ब्लॉग आपल्याला नविन रुपात दिसेल.
पुर्वीच्या डिझाइन मध्ये एक नवा कॉलम टाकण्यात आला आहे.
या नविन रुपाबद्द्ल जरुर प्रतिक्रिया कळवा.
धन्यवाद !
Labels:
मराठी
Saturday, 23 February 2008
मोहन जोशी आज रत्नागिरीत
मराठी नाटय परीषदेचे अध्यक्ष आणि सुविख्यात मराठी अभिनेते मोहन जोशी आज रत्नागिरीच्या फिनोलेक्स अभियांत्रीकी महाविद्यालयात आले होते. गेला आठवडाभर फिनोलेक्स अभियांत्रीकी महाविद्यालयात हिंदी चित्रपट "कॉलेज कॅंपस" चे चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात मोहन जोशींची
प्रमुख भुमिका आहे. या निमित्ताने मोहन जोशींची भेट झाली.
Labels:
छायाचित्रे
माझी आवडती माहितीपर संकेतस्थळे भाग - 2
माझी आवडती माहितीपर संकेतस्थळे भाग - 2
मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देणार आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील दुसरे पुष्प आहे..
ब्लॉगवाणी . कॉम -->>
http://www.blogwani.com/

ब्लॉगवाणी हे संकेतस्थळ मराठीब्लॉग्ज प्रमाणेच सर्व मराठी ब्लॉगर्सना एकत्र आणण्याचे काम करते. या संकेतस्थळावर तुम्ही असंख्य लेख वाचू शकता. तुमचा स्वतःचा ब्लॉग असल्यास तो तुम्ही येथे पाठवू शकता. ब्लॉगवाणीला ई-मेल करुन तुम्ही तुमचा ब्लॉग येथे सबमीट करु शकता.
ब्लॉगवाणीने पुरविलेल्या बटनवर क्लिक केल्यास आपला लेख लगेच ब्लॉगवाणीवर दाखवला जातो. यामुळे तुमच्या ब्लॉगची वाचकसंख्या वाढेल.

Friday, 22 February 2008
अबब किती हे अपघात ?

अबब किती हे अपघात
दिल्लीच्या ब्लुलाईन बस सेवेने विश्वविक्रमच केला आहे. २००६ सालामध्ये या बससेवेमुळे ८२०० अपघात घडले. आज वृत्तपत्रांमध्ये ही आकडेवारी प्रसिध्द झाली आहे. हा एक अनोखा विश्वविक्रमच आहे आणि या अपघातांमध्ये तब्बल २०५० जण मृत्युमुखी पडले आहेत.
सध्या दिल्लीकरांना ही बस म्हणजे यमराजाचाच अवतार वाटत असावी. पादचाऱ्यांचे प्राण धोक्यात आहेत. दिल्ली उच्चन्यायालयानेही या बसवर ताशेरे ओढले होते.
खर तर एवढ सगळ झाल्यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे होते पण ज्याअर्थी न्यायालयाने हस्तक्षेप केला त्याअर्थी सर्व स्पष्ट होते.
Labels:
माझा भारत
किती उशीर ?
किती उशीर ?
सध्या मी एम्.सी.ए. च्या पाचव्या सत्राच्या निकालाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. परीक्षा होउन ४५ दिवस केव्हाच उलटले तरी अजून निकालाची कोणतीच चिन्हे नाहीत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात लागेल म्हणता म्हणताशेवटचा आठवडा जवळ आला. गेल्या वेळी लागलेल्या चांगल्या निकालामुळे ह्यावेळी अपेक्षा वाढल्यात , पाहू काय होते ते ?

Thursday, 21 February 2008
अखेर उपग्रह नष्ट केला.
गेला महिनाभर ज्या अमेरीकन उपग्रहाची चर्चा होती तो "यु.एस्.ए.१९३" उपग्रह अमेरीकेने नष्ट करण्यात यश मिळवले. हा उपग्रह जगात कोठेही कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे जिवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
हवाई येथील अमेरीकन युध्दनौकेवरुन सोडलेल्या क्षेपणास्त्राद्वारे हा उपग्रह पाडण्यात आला. या मोहीमेबाबत संशयही व्यकत करण्यात येत आहे. चिनने यापुर्वी उपग्रह-विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती कदाचित त्याला प्रत्युत्तर म्हणुन अमेरीकेने ही खेळी खेळली असेल.
Labels:
तंत्रज्ञान-विज्ञान,
परदेश वार्ता
Tuesday, 19 February 2008
काही मजेदार छायाचित्रे.
काही मजेदार छायाचित्रे.
नेटवर फेरी मारताना मला काही मजेदार छायाचित्रे सापडली आहेत, तुमच्या मनोरंजनासाठी मी ती छायाचित्रे येथे पाठवत आहे.
१) जेट स्कुटर

२) अत्याधुनिक गाडी

Labels:
छायाचित्रे,
परदेश वार्ता
आज शिवजयंती

आज शिवजयंती . आपणा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा.
जय देव, जय देव, जय जय शिवराया ।
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ॥ धृ ॥
आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला ।
आला आला सावध हो शिवभूपाला ।
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला ।
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला ॥१॥
श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी ।
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी ।
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता ।
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥
त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो ।
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ।
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया ।
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥
ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला ।
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला ।
देशास्तव शिवनेरी घेई देहाला ।
देशास्तव रायगडी ठेवी देहाला ।
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला ।
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥
- स्वा.वी. विनायक दामोदर सावरकर
Labels:
दिनविशेष
अखेर भारत विजयी

धोनी आणि युवराजच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने शेवटच्या षटकात विजयश्री खेचून आणली. एक वेळ भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता पण महेंद्रच्या संयमी खेळीमुळे आपण विजयी झालो. अखेर भारतीय संघाने पराभवाची साखळी तोडली. पहिल्या सत्रात काही वेळ भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व होते. नंतर मात्र संघकारा आणि महेला जयवर्धनेने चांगली भागीदारी निभावली. शेवटच्या षटकांमध्ये चांगली फटकेवाजी झाली.
भारताची सुरुवात खराब झाली सचिन शुन्यावर बाद झाला. संघाची पडझड धोनी आणि युवराजने रोखली. धोनीने एक बाजू लावून धरली आणि शेवटी त्यानेच शेवटच्या षटकात भारताला विजय मिळवून दिला.
Labels:
क्रिकेट,
परदेश वार्ता,
माझा भारत
फिडेल कॅस्ट्रोची निवृत्ती

क्युबा कॉम्युनिस्ट क्रांतीचे जनक आणि क्युबाचे सर्वेसर्वा फिडेल कॅस्ट्रो यांनी आज आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तत्पुर्वी जुलै २००६ मध्ये त्यांनी राज्यकारभार तात्पुरता भावाकडे सोपवला होता. परंतु आज बी.बी.सी. च्या बातमी नुसार ते कायमचे पाय उतार झाले.
प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना हा निर्णय घेणे भाग पडले. एक सामर्थ्यशाली नेता अशी त्यांची ओळख आहे. १९५९ च्या क्युबन कॉम्युनिस्ट क्रांती पासून त्यांचा क्युबावर एकछत्री अंमल राहीला हे विशेष. गेले १८ महिने ते राज्यकाराभारापासून दुर होते.
Labels:
परदेश वार्ता
Monday, 18 February 2008
आज अतिमहत्त्वाचा भारत - श्रीलंका सामना
आज अतिमहत्त्वाचा भारत - श्रीलंका सामना ऍडलेट ओव्हल येथे रंगणार आहे. भारतासाठी हा सामना फार महत्त्वाचाआहे. गेल्या सामन्यात पराभव स्विकारणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास डळमळित आहे. मुनाफ आणि युवराजपूर्ण फिट वाटत नाहीत. हा सामना भारताला जिंकावाच लागेल नाहीतर पुढची वाट बिकट आहे.
भारतीय गोलंदाजी भक्कम स्थितीत आहे, प्रश्न आहे तो फलंदाजीचा. आपली फलंदाजी सातत्याने अपयशी होतेय. युवराजला अद्याप सुर गवसलेला नाही. भारताचा पाच फलंदाज घेउन खेळायचा डावही फसला आहे. आज कदाचितभारत सहा फलंदाजांसह उतरेल.
भारत विजयी होवो हीच प्रार्थना..
भारतीय गोलंदाजी भक्कम स्थितीत आहे, प्रश्न आहे तो फलंदाजीचा. आपली फलंदाजी सातत्याने अपयशी होतेय. युवराजला अद्याप सुर गवसलेला नाही. भारताचा पाच फलंदाज घेउन खेळायचा डावही फसला आहे. आज कदाचितभारत सहा फलंदाजांसह उतरेल.
भारत विजयी होवो हीच प्रार्थना..
Labels:
क्रिकेट,
परदेश वार्ता,
माझा भारत
माझी आवडती माहितीपर संकेतस्थळे भाग - १
माझी आवडती माहितीपर संकेतस्थळे भाग - १
मित्रांनो या सदरात मी तुम्हाला काही माहितीपर मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देणार आहे. तर या संकेतस्थळ मलिकेतील पहिले पुष्प आहे..१) मराठीब्लॉग्ज.नेट
-->> http://marathiblogs.net/

अत्यंत यशस्वी मराठी संकेतस्थळ म्हणून मराठीब्लॉग्ज.नेट ची ओळख आहे. नेटची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ई-मेलिंग संकेतस्थळे आणि खासगी संकेतस्थळांचे युग होते. त्यानंतर आले ते फ़्री वेबहोस्टींगचे युग यात प्रामुख्याने जिओसिटीज,त्रीपॉडने संकेतस्थळांसाठी मोफत जागा पुरवली. सध्या ब्लॉग्जचे युग सुरु आहे. हे एक नविन तंत्रज्ञान आहे. जे अत्यंत सोपे आहे. तर या ब्लॉग्जच्या युगात सर्व मराठी ब्लॉग्जधारकांना एकत्र आणण्याचे काम या संकेतस्थळाने केले आहे.
ह्या संकेतस्थळाची नविन रचना अत्यंत आकर्षक अशी केली आहे. सर्व सभासदब्लॉग्जवरील नविन लेख आपण येथे पाहू शकता आणि जवळजवळ ५७९ मराठी ब्लॉजची मजा लुटू शकता. तुम्ही या संकेतस्थळाचे सभासद होउन स्वतःच्या ब्लॉगचे चाहते वाढवू शकता.
२००५ साली या संकेतस्थळाची सुरुवात झाली आणि आज हे मराठीतील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तेव्हा जरुर भेट द्या आणि मराठी ब्लॉग्जची मजा लुटा.
- वामन परुळेकर
शांता शेळके यांची अजरामर कविता
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा
जेथे मिळे धरेला, आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रवीबिंब टेकलेले
जेथे खुळया ढगांनी, रंगीन साज ल्यावा
स्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला, मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा, स्वप्नीच वेध घ्यावा
--- शांता शेळके
Sunday, 17 February 2008
क्रिक-इंन्फो चे डेक्सटॉप अलर्ट
क्रिक-इंन्फो चे डेक्सटॉप अलर्ट

क्रिकेटच्या ताज्या बातम्या, हलता धावफलक आणि विकेट अलर्ट तुम्ही तुमच्या डेक्सटॉप वर पाहू शकता. तेही मोफत डाउनलोडने. या सॉफ्टवेअरचे वैशिष्टय म्हणजे यावर तुम्ही तुमच्या इतर आवडत्या संकेतस्थळावरील बातम्यांचे फीड देउ शकता. आणि स्कोअर सोबतच बातम्याही पाहू शकता. फक्त यासाठी इंटरनेटची गरज आहे.
यासाठी खालिल गोष्टींची गरज आहे.
> इंटरनेट कनेक्शन
> विंडोज ऑपरेटींग सिस्टीम एक्स.पी.
> ५ एम्. बी. हार्डडिस्क जागा
> सि.पी.यु. वेग - ईन्टेल्© पेंटीयम© ४०० मेगाहर्ट्झ
> रॅम - २५६ एम्.बी.
डाउनलोड लिंक ->
http://downloads.cricinfo.com/db/PRODUCTS/ALERTS/InstallCricinfoDesktopAlerts_1.13.exe
Labels:
क्रिकेट,
तंत्रज्ञान-विज्ञान
आठवणीतील मराठी मालिका
आठवणीतील मराठी मालिका
मुंबई दूरदर्शन वरील जुन्या मालिका
भिकाजीराव करोडपती
बोक्या सातबंडे
छत्रपती शाहु महाराज
छायागीत
आरोग्य संपदा
आमची माती आमची माणस
कामगार विश्व
यातील छत्रपती शाहु महाराज माझ्या विशेष आठवणीतील आहे. रविवारी सकाळी ८ वाजून ३० मिनीटांनी मालिकेचे प्रक्षेपण व्हायचे. क्लासमुळे मी सकाळी हायस्कूलमध्ये जात असे. मात्र सगळा लक्ष्य घराकडे असायचा. कधी एकदा ८ वाजतात आणि मी घरी जातो असे व्हायचे.
घरी आलो की गरमागरम पोहे,चहा आणि सोबत दुरदर्शनवरील मालिका. ९ वाजेपर्यंत ही मालिका चालू असायची. योग्य पात्र निवड, भव्य लोकेशन्स, उत्तम दिग्दर्शन यामुळे मला ही मालिका फार आवडायची. आजही शाहू महाराज म्हटले की मला हिच मालिका आठवते.

Saturday, 16 February 2008
माझे आवडते चित्रपट गीत
कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे सारे
दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे
गीतकार --- आरती प्रभू
चित्रपट--- सामना
Friday, 15 February 2008
मराठी नगरी ?
मराठी नगरी ?
"अरे महेश वो रीझल्ट लगा क्या? मुझे केटी नही ना?"
"अरे नही रे शायद कल लगेगा"
दोन अस्सल मराठी मुलांमधला हा संवाद.
हे चित्र आजकाल कुठेही पहायला मिळेल. काही तथाकथीत शिकलेली मराठी माणस मराठी बोलायला लाजतात. काहीजणांचा असाही समज आहे की मराठी बोलल तर आपल्याला जुनाट समजल जाईल. येथे मराठी माणस मराठी बोलण्याबाबत उदासिन आहेत आणि आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतोय. काय कारण काय असेल या उदासीनतेबाबत ? आपण जरुर याचा विचार केला पाहिजे. मराठी माणुस आपल्या आप्तस्वकियांचे पाय ओढण्यात तरबेज आहे. इथेही तोच नियम लागु होतो. कुणी मराठीत बोलु किंवा लिहु लागल की त्याच्या व्याकरणाचा तपास इतरांकडुन सुरु होतो. मान्य आहे की व्याकरणदृष्टया भाषाशुध्दी आवश्यक आहे पण नवखा व्यक्ती मात्र उदास होतो. सर्व मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांना प्रोत्साहनाची गरज आहे.
पण काही लोक मात्र केवळ दिखाव्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी वापरतात ते अयोग्य आहे. मी संगणकाचे स्नातकोत्तर शिक्षण घेत आहे मला गरजेपुरती इंग्रजी वापरावीच लागते पण माझ्या अभियांत्रिकी विद्यालयाच्या वर्गातुन बाहेर पडलो की मी आग्रहाने मराठीतच बोलतो.
आपल्या भाषेसाठी आपण जागरुक राहिले पाहिजे. मग दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही. मी शिर्डीला गेलेलो तेव्हा महाराष्ट्राबाहेर आंध्रप्रदेश मध्ये गेल्या सारखे वाटले. सगळीकडे न समजणाऱ्या भाषेतून पाटया होत्या. आता नियम असतानाही ह्या पाटया लागल्याच कश्या ? तेथिल स्थानिक मराठी अधिकारी गप्प कसे राहिले? याचा अर्थ असा होतो की आपण जागरुक नाही आहोत. इतर राज्यात कुठेही मराठी पाटी दिसते का? मराठी भाषा संवर्धन करायची असेल तर आपणच प्रथम मराठी बोलल आणि लिहिल पाहिजे.
धन्यवाद

Thursday, 14 February 2008
आज देव मानसीश्वर जत्रा , वेंगुर्ला
दक्षिण कोकणातील प्रसिध्द देवस्थान श्री देव मानसीश्वरची जत्रा आज संपन्न होत आहे. हजारो सिंधुदुर्गवासिय आणि मुंबईकर चाकरमानी या जत्रेला आवर्जून येतात. या देवस्थानाचे वैशिष्टय म्हणजे देव मानसीश्वर मंदीराच्या परीसरात कोणताही मोठा आवाज निषिध्द आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मंदीराच्या परीसरात कोणतेही वाद्य वाजवणारा व्यक्ती आपली वाट चुकतो.
मंदीराची रचना इतर मंदीराहून वेगळी आहे. खाडीमध्ये उभे असलेले मंदीर आणि फडकणारी निशाण सुंदर वाटतात.
Labels:
दिनविशेष
Wednesday, 13 February 2008
नवा नोकिया एन् ९६
मला याचे रुप फार आवडले पण ह्याला टचस्क्रिनची सोय नाही. कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा आहे म्हणजे छायाचित्रांचा दर्जा उत्तम राहिल.
याची ठळक वैशिष्टये खालिलप्रमाणे -
> कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा
> टी.व्ही.(डि.व्ही.बी.-एच्.) क्षमता
> २४० X ३२० पिक्सेल डिस्प्ले.
> १६ जी.बी. अंतर्गत स्मरणशक्ती
> डिजीटल म्युझिक प्लेयर
> कार्ल ऑप्टीक्स - टेसर लेन्स.
> एफ्.एम्. रेडियो.
> दृश्य रुपांतरण एमपीईजी4 मध्ये.
> दुहेरी एल्.ई.डी. फ्लॅश
Labels:
तंत्रज्ञान-विज्ञान
मराठी हास्य विनोद
दिर्घ अजाराने त्रासलेले काका डॉ. सावंतांकडे जातात.
डॉ.सावंत - तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोण?
काका - डॉ. गावडे.
डॉ. सावंत - अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात.
तुम्हाला कोणता दिला?
काका - तुमच्याकडे जाण्याचा..........
मराठी हास्य विनोद
डॉ.सावंत - तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोण?
काका - डॉ. गावडे.
डॉ. सावंत - अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात.
तुम्हाला कोणता दिला?
काका - तुमच्याकडे जाण्याचा..........
Labels:
मराठी,
हास्य-विनोद
Tuesday, 12 February 2008
इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव
इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव

क्रिकेट इंग्लंडने आज पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. सामना पूर्ण एकतर्फी वाटत होता. एकटया अलस्टर कुकचा अपवाद वगळला तर पुर्ण संघाने निराशा केली. इंग्लंडने १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्युझिलंडने सर्व गडी राखुन १८ षटकात विजय मिळवला.
Labels:
क्रिकेट,
परदेश वार्ता
तिर्थक्षेत्र गणपतीपुळे,महाराष्ट्र
गणपतीपुळे येथील श्री गणेश मंदिरासमोरील प्रवेशव्दाराजवळचा हत्तीचा पुर्णाकृती पुतळा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

Labels:
छायाचित्रे,
पर्यटन
फिनोलेक्स अभियांत्रीकी महाविद्यालयाचे रांगोळी प्रदर्शन
फिनोलेक्स अभियांत्रीकी महाविद्यालयाचे रांगोळी प्रदर्शन
युटोपिया-ब्रेनव्हेवज् २००७ च्या निमित्ताने फिनोलेक्स अभियांत्रीकी महाविद्यालयात रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरेख रांगोळ्या रेखाटल्या होत्या. त्याची ही क्षणचित्रे.
Labels:
मराठी
Subscribe to:
Posts (Atom)