बायचुंग भुतियाची भुमिका योग्यच
भारतीय फुटबॉल संघाचा कप्तान बायचुंग भुतियाने ऑलिम्पिक दौडीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रीया उमटल्या. भुतियाने आपल्या अंतर्मनाची साद ऐकून हा निर्णय घेतला असावा. मला हा निर्णय योग्य वाटतो. लोकशाही राष्ट्रात प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार असतो. मग त्याला खेळाडूही अपवाद नसावेत.
काही लोकांचे असे म्हणणे आहे की, राजकारण आणि खेळ यांना एकत्र आणू नये. मला हे योग्य वाटत नाही. राजकारण हा आपल्या जिवनाचा भाग आहे. जर राजकारणी काही चुकीचे निर्णय घेत असतील तर लोकशाहीत सर्वसामान्य नागरीकच त्यांना विरोध करतात. उदा. टॅक्सीचालक सरकारच्या एखाद्या निर्णयाविरोधात टॅक्सी बंद ठेवतात,बॅंकवाले बॅंक बंद ठेवतात. गांधीजींनीच आपल्याला सविनय कायदेभंगाचा मार्ग दाखवला होता. तर मग आता सांगा , चीनच्या अन्यायी धोरणाचा निषेध करण्यासाठी बायचुंगने घेतलेला निर्णय अयोग्य कसा?
गेली कित्येक वर्षे तिबेटी बौध्द जनतेवर चीनी राज्यकर्ते राज्य करत आहेत. तिबेटी जनतेची स्वतंत्र राष्ट्राची मागणी चीनने नेहमीच फेटाळून लावली. आता तर तिबेटी जनतेचा विरोध मोडून काढून,चीन ऑलिम्पिक ज्योत तिबेटमधून एवरेस्टवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. ऑलिम्पिक शांततेसाठी खेळवले जाते असे काहींचे म्हणणे आहे. जर असे असेल
तर हिंसा करुन ऑलिम्पिक ज्योत तिबेटमध्ये नेण्याचे प्रयत्न का चालू आहेत? बायचुंगला विरोध करणाऱ्यांनी याचा जरुर विचार करावा.
- वा.रा.परुळेकर
3 comments:
आपले परिक्शन आणि निरिक्शन दोन्ही फ़ार छान आहे.
Agreed!!
धन्यवाद मित्रांनो
Post a Comment