गगनभरारी
आजचा दिवस भारतीय अवकाश क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहीला जाईल. आज श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अवकाश केंद्रातून "पीएसएलव्ही सी-9" चे यशस्वी उड्डाण झाले. एकाच वेळी दहा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आले. हा एक विक्रमच आहे. यापूर्वी रशियाने एकाचवेळी सोळा उपग्रह सोडले होते पण त्यांचे एकत्रित वजन ४०० किलो होते. भारतीय उपग्रहांचे वजन ८२० किलो आहे. या प्रक्षेपणानंतर भारताने प्रक्षेपीत केलेल्या उपग्रहांची संख्या ५० झाली आहे.आजच्या मोहीमेची ठळक वैशिष्टये-
- ६९० किलोचा भारतीय दूरसंवेदन उपग्रह "कार्टोसॅट-2 ए' अवकाशात
- 83 किलो वजनाचा "इंडियन मिनी सॅटेलाईट'
- धृवीय उपग्रह प्रक्षेपकाचे तेरावे यशस्वी उड्डाण
- दहा उपग्रहांचे पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपण
२०१४ पर्यंत भारत अवकाशात अंतराळवीर धाडेल. त्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात येत आहेत. २००८ मध्ये चांद्रयान - १, २०१० मध्ये चांद्रयान - २ च्या मोहीमा आखण्यात आल्या आहेत. लवकरच भारत अवकाशात प्रयोगशाळा उभारेल. भविष्यात चंद्रावरील हक्कासाठी जी युध्दे होतील त्यात भारत नक्कीच महत्त्वाची भूमिका पार पाडेल.
No comments:
Post a Comment