Thursday, 10 April 2008

खासगी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या ?खासगी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या ?सध्या खासगी वृत्तवाहिन्यांचा सुकाळ आहे. खासगी इंग्रजी,हिंदी वृत्तवाहिन्या २४ तास बातम्या देत आहेत. यातील काही वाहिन्या स्वतःला राष्ट्रीय म्हणवून घेतात. पण ज्या वाहिन्यांवर दिल्ली,यु.पी.,बिहार,मुंबई या मर्यादित क्षेत्रातल्या बातम्या दाखवल्या जातात त्या वाहिन्या राष्ट्रीय कशा? या वाहिन्यांवर इतर राज्यांच्या बातम्यांसाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, केरळ या राज्यांच्या बातम्या तुलनेत फारच कमी दाखवल्या जातात. काही वाहिन्या तर भारतीय सिनेमा म्हणजे हिंदी सिनेमा असेच समजून चालतात. कन्नड,तमिळ,तेलगू चित्रपट उद्योग फार मोठा उद्योग आहे. या चित्रपटांच्या बातम्यांना या वाहिन्या फारसे महत्त्व देत नाहीत.

मला असे वाटते की जोपर्यंत या वाहिन्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत नाहीत तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय बातम्या देणाऱ्या वाहिन्या म्हणता येणार नाही. या सर्व खासगी राष्ट्रीय वाहिन्यांनी डी.डी.न्यूज या सरकारी राष्ट्रीय वाहिनीकडून आदर्श घ्यावा. डी.डी.न्यूजवर प्रत्येक राज्याच्या बातम्या प्रसारीत केल्या जातात. स्टेट स्कॅन आणि सीटी स्कॅन न्यूजमध्ये प्रत्येक क्षेत्राला वेळ वाटून दिलेला असतो, त्यावेळेत त्या त्या क्षेत्राच्या बातम्या प्रसारीत केल्या जातात. खासगी वाहिन्यांनीही प्रत्येक क्षेत्राला ठरावीक हक्काची वेळ उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन त्या खऱ्या अर्थाने राष्ट्रीय वाहिन्या ठरतील.


No comments:

ShareThis

Visitors Worldwide

free counters