Friday 30 May 2008

हास्य-विनोद



पांडू - तुम्ही किती शिकलात?

मास्तर - B.A.

पांडू - कमाल करता फक्त दोनच अक्षरे शिकलात B A आणि तीही उलटी.

विश्वासाची माती???

विश्वासाची माती ???

Bookmark and Share




गेला आठवडाभर टी.व्ही. मिडीया आणि संकेतस्थळांवर एक बातमी मोठया प्रमाणात चर्चेत होती. ही बातमी म्हणजे कोल्हापूरच्या एका युवकाने केलेली फसवणूक. आपली निवड नासात झाल्याचा दावा या युवकाने केला होता. गंमत म्हणजे देशातील काही टी.व्ही. वाहिन्यांनी या निवड बातमीचे डोळे झाकून प्रक्षेपण केले होते. त्यावेळी बातमीचा सत्यपणा पडताळण्याची गरज कुठल्याही वाहिनीला वाटली नव्हती. सर्वांनी डोळे झाकून बातमी दिली होती. मिडियावर विश्वास ठेवणे योग्य होइल का? हा विचार मी करतोय. एका युवकाने मिडियाला लिलया फसवले तर मग अन्य बातम्यांवर तरी विश्वास कसा ठेवायचा?

राज ठाकरेंचे आंदोलन असो किंवा कांबळेची निवड, लोकांचा टी.व्ही.मिडियावरचा विश्वास उडत चालला आहे. बातमी द्यायची घाई एवढी की शहानिशा करायलाच वेळ नाही. नव्या नव्या चौविस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या, त्यांच्यातील भयानक स्पर्धा, या सगळ्यात दर्जेदार बातम्या द्यायला वेळ कोणाला आहे. मित्रांनो या वाहिन्यांच्या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येकाच्या वैयक्तिक मतांवर अवलंबून आहे. पण दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या वाहिन्यांच्या दर्जावर विचार व्हायलाच हवा. जेव्हा तासनतास नट नटयांच्या बातम्या दाखवताना प्रेक्षकांना हेच आवडते म्हणून आम्ही दाखवतो ही पुस्ती जोडली जाते तेव्हा जरुर विचार व्हायलाच हवा.

पण हा टी.आर्.पी. तरी खरा आहे का? लोकसभेत मंत्र्यांनीही टी.आर्.पी.बद्दल संशय व्यक्त केला होता. त्यांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न झाला होता. लोकशाहीसाठी हा एक भयानक प्रकार आहे. मिडिया अभिव्यक्तीच्या नावाखाली दबावतंत्र वापरणे घातकच आहे. सिंधुमहोत्सवावेळी काही वाहिन्यांचे खरे स्वरुप उघडे झाले होते. त्यावेळी कठोर टीका झाली होती. या वाहिन्यांमध्ये काही वाहिन्यांनी आपला दर्जा मात्र टिकवून ठेवला आहे. ह्या वाहिन्यांना लोकाश्रय मिळणे गरजेचे आहे. शक्य आहे की माझ्या मतांशी आपण सहमत नसाल . आपल्या मतांची जरुर नोंद करा.


Wednesday 14 May 2008

नागरी सुरक्षा

नागरी सुरक्षा


जयपूर येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. मुंबई अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असल्याने शहराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
अशा बॉम्बस्फोटांच्या घटना टाळण्यासाठी नागरीकांनी काही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.



नागरीकांनी घ्यावयाची काळजी


  • तुमच्या दुकानात किंवा परीसरात येणाऱ्या प्रत्येक बॉक्स,पॅक,बॅगची कठोर तपासणी करा.
  • एकांतात ठेवलेली आणि संशयित वाटणारी पॅकेजीस,बॅग्जबद्दल ताबडतोब जवळच्या पोलिस स्थानकास माहिती द्या.
  • आपल्या दुकान किंवा घराच्या परीसरात एखादी अनोळखी वा संशयित व्यक्ती फिरत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.
  • मालक नसलेल्या गिफ्ट बॉक्स, खेळणी यांना हात लावू नका.
  • तुमच्या परीसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख तपासून पहा.
  • जागा भाडयाने देताना त्या व्यक्तिची ओळख तपासून पहा. त्यासंबंधीत कागदपत्रे स्वतःजवळ ठेवा.

आणिबाणीच्या काळात प्रशासनाशी सहकार्य करा आणि शांतता राखा.

हास्य-विनोद



टिचर- गणेश तूला एवढा उशिर का झाला?

गणेश- मॅडम त्या बोर्डमुळे मला उशिर झाला।

टिचर- कोणत्या बोर्डमुळे.

गणेश- मॅडम रस्त्यावर लावलेला तो बोर्ड मी वाचला. त्यावर स्पष्ट शब्दात लिहीले होते "पुढे शाळा आहे, सावकाश जा."





कळी

कळी

Tuesday 13 May 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ९

माहितीपर संकेतस्थळे भाग -

आघाडीची वॉलपेपर संकेतस्थळे

नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या संगणकावर सर्वोत्तम वॉलपेपर असावेत अशी इच्छा असतेच. या लेखात मी काही निवडलेल्या वॉलपेपर संकेतस्थळांची यादी देत आहे. तुम्ही जरुर या संकेतस्थळांचा वापर करुन आनंदीत व्हाल. काही अप्रतिम वॉलपेपर डाउनलोड करण्याची संधी आपल्याला मिळेल.




धन्यवाद

माहितीपर संकेतस्थळे भाग - ८ ("अॅड धिस")

माहितीपर संकेतस्थळे भाग - ८


> Addthis

आज आपण अशा संकेतस्थळाबद्दल जाणुन घेवू की ज्या संकेतस्थळाचा उपयोग करुन तुम्ही तुमचे ब्लॉग कंटेंट सर्वदूर पोहचवू शकता. "अॅड धिस" या संकेतस्थळावर तुम्हाला "अॅड धिस" हे बटण पुरवले जाते. हे बटण तुम्ही तुमच्या पेज इलेमेंट मध्ये समाविष्ट करु शकता.


हे बटण मिळविण्यासाठी प्रथम ह्या संकेतस्थळाचे मुखपृष्ठ उघडावे. त्यावर "Get your button" असे लिहीले असेल, त्यावर क्लिक करा. नंतर एक फॉर्म येइल तो भरा. पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला खाते तयार करावे लागेल. त्यानंतर दिलेला कोड तुम्ही तुमच्या ब्लॉगवर टाका.


"अॅड धिस" हे बटण वापरुन तुम्ही तुमच्या ब्लॉगचा बुकमार्क विविध सेवा पुरविणाऱ्या संकेतस्थळांवर करुन देवू शकता.


जाता जाता या संकेतस्थळावर नजर टाका. तुम्हाला तुमच्या ब्लॉग साठी विविध विजेट या संकेतस्थळावर मिळतील.
> http://www।widgetbox.com/

धन्यवाद



Monday 12 May 2008

माहितीपर संकेतस्थळे भाग - ७ (भारतीय ब्लॉग नोंदणी)

माहितीपर संकेतस्थळे भाग - ७ (भारतीय ब्लॉग नोंदणी)





मित्रांनो गेले पाच महिने मी तुम्हाला या सदरात काही माहितीपर आणि मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देत आहे. मी आज तुम्हाला काही अशा संकेतस्थळांची माहिती देणार आहे की ज्यावर नोंदणी करुन आपण आपल्या ब्लॉगची वाचकसंख्या वाढवू शकता. आज पहिल्या भागात आपण फक्त भारतीय ब्लॉग नोंदणी करणाऱ्या संकेतस्थळांबद्दल जाणूण घेउ. यातील काही संकेतस्थळांबद्दल तुम्हाला माहिती असेलच. उदा. मराठी ब्लॉग्ज नेट आणि ब्लॉगवाणी. मी तुम्हाला खालील भारतीय संकेतस्थळे सुचवत आहे. सदस्य होण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमचा ब्लॉग भारतीय असणे आवश्यक आहे.

भारतीय ब्लॉग नोंदणी संकेतस्थळे


1> ब्लॉगवाणी
ब्लॉगवाणी हे संकेतस्थळ मराठीब्लॉग्ज प्रमाणेच सर्व मराठी ब्लॉगर्सना एकत्र आणण्याचे काम करते. या संकेतस्थळावर तुम्ही असंख्य लेख वाचू शकता.

या संकेतस्थळाबद्दल मी यापूर्वीही माहिती दिली आहे. त्याची लिंक देत आहे. टिचकी मारुन पहा.

http://marathisamuday.blogspot.com/2008/02/2.html


2> मराठीब्लॉग्ज.नेट

अत्यंत यशस्वी मराठी संकेतस्थळ म्हणून मराठीब्लॉग्ज.नेट ची ओळख आहे. २००५ साली या संकेतस्थळाची सुरुवात झाली आणि आज हे मराठीतील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तेव्हा जरुर भेट द्या आणि मराठी ब्लॉग्जची मजा लुटा.

या संकेतस्थळाबद्दल मी यापूर्वीही माहिती दिली आहे. त्याची लिंक देत आहे. टिचकी मारुन पहा.

http://marathisamuday.blogspot.com/2008/02/blog-post_18.html


3> ब्लॉगस्ट्रीट इंडीया

ब्लॉगस्ट्रीट इंडीया हे संकेतस्थळ आपल्या ब्लॉगला वर्गवारीनुसार समाविष्ट करुन घेते. अधिकाअधिक वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी ह्या संकेतस्थळाचा उपयोग होइल.तुमच्या ब्लॉगच्या लोकप्रियतेनुसार तुम्ही अव्वल बनू शकता.


4> इंडिया ब्लॉग्ज १.०

हे संकेतस्थळ आपल्या ब्लॉगला वर्गवारीनुसार समाविष्ट करुन घेते. पहिल्याच पानावर सजेस्ट अ ब्लॉगवर क्लिक करुन तुम्ही तुमचा ब्लॉग नोंदणी करु शकता.


5> देसी ब्लॉग्ज

देसी ब्लॉग्ज ह्या संकेतस्थळावर फार कमी मराठी ब्लॉग्ज आहेत. आपण आपला ब्लॉग या संकेतस्थळावर जरुर नोंदणीकृत करा. मराठी संख्या वाढली पाहिजे.


6> कामत ब्लॉग पोर्टल

कामत ब्लॉग पोर्टल हे संकेतस्थळ नावावरुन तरी मराठी वाटते. या संकेतस्थळावर तुम्ही आत्ता अपडेट केलेला तुमचा ब्लॉग पाहू शकता. इंडीयन ब्लॉग नोंदणी मध्ये हे संकेतस्थळ अव्वल आहे. त्यामुळे तुम्ही मोठी वाचकसंख्या मिळवू शकता.


क्रमशः

(कोणतीही शंका असल्यास जरुर कमेंट करा. शक्यतो नोंदणीसाठी वेगळा ई-मेल पत्ता तयार ठेवा.)

Sunday 11 May 2008

द ग्रेट मालवण



ग्रेट मालवण (ऑइलपेंट इफेक्ट)

सर्वाधिकार वामन परुळेकर

सर्व छायाचित्रे © अंतर्गत सुरक्षित

बळी

सौरभ सहारनपूरच्या सिमेवर उभा होता. सहारनपूर शत्रूसैन्याच्या हल्ल्यात बेचिराख झालेले शहर. सौरभ कसाबसा या शहरातून निसटला होता. त्याचे प्राण वाचले होते पण तो निराश होता. या हल्ल्याच्यावेळी तो काहीच करु शकला नव्हता. शत्रु देशाची विशाल सेना त्याच्या गावावर तुटून पडली होती. माणुसकीचा गंधही नसलेल्या या हैवानांनी त्याच्या गावाचे स्मशाण केले होते.

गेले तीन दिवस सौरभ उपाशीपोटी आपले प्राण वाचवत जंगलातून फिरतोय. उंच डोंगरावरुन त्याला गावातील दृश्य दिसत होते. सगळीकडे आगीचे लोट. शत्रु सैन्य माघारी फिरले तसा सौरभ गावाकडे वळला. दबक्या पाउलांनी त्याने गावात प्रवेश केला. काहीच शिल्लक नव्हते. सैतानांनी सर्वाना मारले होते. एखादा चुकून जिवंत राहीला असेल तर त्याला मरेपर्यंत भाला खूपसून मारण्यात आले होते. आपल्या गावाची स्थिती पाहून सौरभ कोसळलाच.

हे सगळे का आणि कशासाठी ? जमिनीच्या टीचभर तुकडयासाठी.
राज्याच्या सीमेचा वाद राजांचा त्यात आमचे काय चुकले? सौरभ स्वतःशीच बडबडत होता.

माझ्या गोरगरीब गावकऱ्यांनी काय पाप केले होते? सौरभ आक्रोश करत खाली पडला.

एव्हाना राजाला हल्ल्याची बातमी कळली. त्याने आपल्या सेनेला बदला घेण्याचे निर्देश दिले. आता शत्रु पक्षातील एखादे गाव असेच जळणार आणि सुडाची ही साखळी अशीच सुरु राहणार.

- वामन परुळेकर

Saturday 10 May 2008

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन

उल्लेखनीय परिचारिका सेवेबद्दल नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कारासाठी आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील परिचारिका वैशाली सुरेश पाटील आणि नगर जिल्हातील सरला राजेंद्र भावसार यांची निवड झाली आहे. या दोन्ही परिचारिकांचे हार्दिक अभिनंदन. परिचारिकांचे काम अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळेच चांगले काम करणाऱ्या या परिचारिकांचे अभिनंदन करणे माझे कर्तव्य ठरते. १२ मे रोजी या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

सागरेश्वर सुर्यास्त

सागरेश्वर सुर्यास्त



Friday 9 May 2008

जास्वंद

जपानी मोबाइल कथा (एका जपानी कथेचा स्वैर अनुवाद)

जपानी मोबाइल कथा
( एन्.एच्.के. या जपानी वाहिनीवरुन प्रसारीत झालेल्या जपानी कथेचा स्वैर अनुवाद)


चॅंग एकटाच टोकियो स्टुडिओत रहायचा. अजून नोकरी नाही आणि खाण्यापिण्याचे वांदे अशात टोकियोत आणखी जागा कुठून मिळणार. सकाळी नोकरीचा शोध आणि रात्री उशिरा हात हलवत परत घरी येणे हा त्याचा नित्यक्रम ठरला होता. त्याच्या शेजारी एक सुंदर मुलगी रहायची , तिचे नाव होते टीना. दोघांची चांगली मैत्री होती. एकामेकांना एस्.एम्.एस्. , फोनवर बोलणे चालायचे.

एका रात्री चॅंग उशिरा घरी परतला त्याच्या मोबाइलवर संदेश होता.
"चॅंग मी तुझ्यावर प्रेम करते, तुझी टीना"

चॅंगला संदेश वाचून धक्का बसला. त्याच्या मनातही तसे काही नव्हते. त्याने रीप्लाय दिला.
"आपली फक्त मैत्री आहे प्रेम नव्हे."

पुन्हा संदेश आला.
"चॅंग पुन्हा विचार कर, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत."

चॅंगने उत्तर दिले
"टीना मी तुझ्यावर प्रेम करत नाही. शुभ रात्री"

चॅंगने मोबाइल टेबलवर ठेवला आणि तो फ्रेश व्हायला बाथरुममध्ये गेला. थोडयावेळाने चॅंगला एका अनोळखी नंबरवरुन संदेश आला.
"मी तुझ्यावर प्रेम करते"

चॅंगने उत्तर दिले.
"तू कोण आहेस? मला ओळखतेस का?"

"हो. मी तुला ओळखते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू माझ्यावर प्रेम करतोस ना?"

चॅंग गोंधळला. आत्ता कुठे एका संकटातून तो बाहेर आला होता. आता ही नविन कोण? चॅंगला प्रश्न पडला.
तरी पण थोडा वेळ टाइमपास म्हणून चॅंगने तिला प्रतिसाद दिला.
"ओ तर अनामिका तू तुझे नाव सांग ना"

"नावात काय आहे. मी तुझ्या वर फार प्रेम करते."

"किती?"

"तुझ्यासाठी मी माझे प्राण पण देइन."

आता जरा जास्तच होतय. असा विचार करुन चॅंगने झोपायचा निर्णय घेतला. तो झोपला आणि अचानक पाठोपाठ दहा संदेश त्याच्या मोबाइलवर आले. चॅंग खडबडून जागा झाला. सर्व संदेश त्याच नंबरवरुन आले होते. आता मात्र चॅंग वैतागला. त्याने त्या नंबरवर फोन केला आणि फोन केल्यावर जो संदेश ऐकवला गेला त्याने तर त्याची झोपच उडवली.

पलिकडून संदेश आला की "हा क्रमांक अस्तित्वात नाही.कृपया पुन्हा डायल करा."

तेवढयात चॅंगला एक नवा संदेश आला. तो एक व्हिडिओ संदेश होता. तो पाहून चॅंग उडालाच. या संदेशात त्याचेच घर होते. तो रात्री घरी आल्यापासून झोपेपर्यंतचे चित्रीकरण त्यात होते. त्याचे हात थरथरु लागले. संदेश पाठवणारी आपल्याच घरात आहे याची जाणिव त्याला झाली. भितीने तो बाहेर पळू लागला आणि मागे वळतो तर काय रक्ताने माखलेली,विचित्र चेहरा करुन टीना उभी होती. तो तिथेच बेशुध्द पडला.

दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा टी.व्ही.वर टीनाच्या आत्महत्येची बातमी दाखवली जात होती.

Thursday 8 May 2008

पुतीन रशियाचे नवे पंतप्रधान


पुतीन रशियाचे नवे पंतप्रधान



५५ वर्षांचे पुतीन रशियाने नवे पंतप्रधान होतील. पुतीन यांच्या युनायटेड रशियन पार्टीला पूर्ण बहुमत आहे. दोन वेळा रशियाचे राष्ट्रपतीपद भुषविलेले पुतीन तिसऱ्या वेळी रशियन कायद्यामुळे राष्ट्रपती बनू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपद स्विकारले. रशियन पंतप्रधानांच्या अधिकारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या पाच वर्षात पुतीन यांनी रशियाला चांगले नेतृत्त्व दिले. रशियाची जी.डी.पी. वाढही दर्शनिय आहे. पुतीन यांच्या सरकारने भारताबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंधही कायम राखले. भविष्यातही पुतीन यांचा रशियावरील दबदबा कायम राहील यात शंकाच नाही.

Wednesday 7 May 2008

अक्षयतृतीया

सर्व मराठी बांधवांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.

अक्षयतृतीया हा दिवस साडेतीन मुहुर्तां पैकी एक मानला जातो. ही अक्षयतृतीया आपल्या जीवनात सुख आणि समृध्दी घेउन येणारी ठरो हीच प्रार्थना.
धन्यवाद.


Tuesday 6 May 2008

एस्.टी.ला २३ कोटीचा नफा.

एस्.टी.ला २३ कोटीचा नफा.

आपल्या एस्.टी.ला २३ कोटीचा नफा झाला आहे. एशियातील सर्वात मोठया परीवहन महामंडळासाठी ही खुशखबरच आहे. एस्.टी च्या ताफ्यात १६२०० बसेस आहेत. ही प्रगती अशीच राहीली तर पुढील वर्षी एस्.टी. १५० कोटीचा नफा कमावेल. चला महाराष्ट्रासाठी ही एक जमेची बाजू आहे.

दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे अभिनंदन

दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे अभिनंदन

माझे ब्लॉगर मित्र आणि दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाला अकोला येथील "अंकुर साहित्य संघा'तर्फे देण्यात येणारा 2007 चा "कवी बी पुरस्कार' (महाराष्ट्र वगळून) जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांचे मराठी समुदायतर्फे अभिनंदन.

संघातर्फे 10 व 11 मे रोजी चाळीसगाव येथे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. श्री. क्षीरसागर यांचा या आधी "गर्भावल्या संध्याकाळी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला असून महाराष्ट्रातील विविध साहित्यविषयक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक संघटनेचा वेणेगुरकर स्मृती पुरस्कारही त्यांना यापूर्वी मिळाला आहे. तसेच संवाद नाशिक व गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीचे कविता व कथालेखनाची पारितोषिके व मराठी विज्ञान परिषदेचा विज्ञानरंजन कथेचे पारितोषिक मिळाले आहे. ते गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे माजी कार्यकारिणी सदस्य, ताळगाव मराठी संस्कार केंद्राचे उपाध्यक्ष, कविकुल साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन उद्यापासून

श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन उद्यापासून

दक्षिण कोकणचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरवलीच्या प्रसिध्द वेतोबाचा १२ वा वर्धापन दिन ७ ते ९ मे या कालावधीत साजरा होणार आहे.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे -


मे

संध्याकाळी ७ ते १० - सौ.निलाक्षी पेंढारकर,सुरेश बापट,चंद्रकांत कोळी यांचा नाटयरजनी कार्यक्रम

रात्री ११ - नाइक-मोचेमाडकर कंपनीचा दशावतारी नाटयप्रयोग




मे

संध्याकाळी ७ ते ९ - स्वरांगण

रात्री ९.३० - "सोहं" प्रतिष्ठाण मुंबई यांचा सुधिर फडके यांच्या गीतांची मैफील



मे

दुपारी १ ते ४ - महाप्रसाद

रात्री ९ ते १० - देवाची पालखी

रात्री ११ वाजता - मुंबई मराठी साहित्य संघ यांचे अशोक परांजपे लिखित "संत गोरा कुंभार नाटक"

Monday 5 May 2008

इस्राइल - वय वर्षे ६०

इस्राइल - वय वर्षे ६०



येत्या १४ मेला इस्राइल राष्ट्र ६० वर्षांचे होणार आहे. १४ मे १९४८ ला इस्राइलने स्वतःला स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषीत केले होते. तेव्हापासून हा देश सतत युध्दात गुंतलेला आहे. गेली साठ वर्षे इस्राइलमध्ये अशांतता आणि हिंसा नांदते आहे. घरच्या स्वकिय शत्रुबरोबरच परकिय शत्रुंचा सामना इस्त्राइलला करावा लागतो. आपले जीवन सुरक्षित नसल्याचे अनेक इस्त्राइली नागरीकांना वाटते. गेली साठ वर्षे वापरलेल्या लष्करी ताकदीचा पॅलेस्टाइनचा प्रश्न सोडवण्यात फारसा उपयोग झाला नाही.

अशा या अशांत इस्त्राइलला शांतता लाभो आणि इस्त्राइली आणि पॅलेस्टीअन लोकांचे जीवन सुखी होवो हीच प्रार्थना करुया.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

सध्याच्या जगात सर्वात मोठे प्रदूषण कोणते? माझ्या मते विचारांचे आणि आचारांचे प्रदूषण हे सध्याच्या जगातील सर्वात मोठे प्रदूषण आहे. जिकडे पहाल तिकडे हे प्रदूषण आहे. विचार एक आणि आचार वेगळाच. दिखावू विचार काय कामाचे? आपले नेते पहा ना फार मोठी मोठी आश्वासने देतात. पाळतात किती? पुरोगाम्यांची तीच परीस्थिती. महापुरुषांच्या विचारांची होळी करण्याचा विडाच काहीजणांनी उचलला आहे.महापुरुषांचे भिंतीवर लावलेले फोटो हे दिखाव्यासाठीच असतात. जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना भाषणे द्यायची आणि मग सगळे विसरुन जायचे.

आपण जे बोलतो ते प्रत्यक्षात किती आणतो? भ्रष्टाचारावर दररोज टीका होते, सर्वचजण टीका करतात, पण भ्रष्टाचार कमी होत नाही। मी स्वतः जातियतेवर नेहमी कठोर टीका करतो पण मी स्वतः मागे हटलो नाही। लाख विरोध असतानाही मी आंतरजातिय विवाह केला आहे. माझ्या मते जोपर्यंत आपण स्वतः पुढे येउन स्वतःचे विचार आचारात रुपांतरीत करत नाहीत तोपर्यंत जग बदलण्याचे स्वप्न बघण्यात अर्थ नाही. महापुरुषांचे विचार जर आपल्या बुध्दीला पटत असतील तर ते जरुर आचरणात आणावे. केवळ बोलुन काहीच फायदा नाही.

बाबा आमटे,मदर तेरेसा,महर्षी कर्वे,गाडगेबाबा यासारखे अनेक आदर्श आपल्याकडे आहेत ज्यांनी नेहमी आपले विचार सत्यात उतरवले. "अलसस्य कुतो विद्या?" तर मग चला चांगल्या विचारांचा संकल्प करा आणि हे विचार आचरणात आणा.

Sunday 4 May 2008

हास्य-विनोद



एकदा संता आपल्या टॅक्सीत झोपला होता तेवढयात एक जपानी व्यक्ती त्याच्या टॅक्सीत येउन बसली. संताने टॅक्सी सुरु केली. हा जपानी सतत जपानची स्तुती करत होता. तेवढयात एक होंडा गाडी संताच्या टॅक्सीला ओव्हरटेक करुन पुढे गेली.
जपानी बोलला "होंडा,व्हेरी फास्ट,मेड एन जपान".
तेवढयात एक टोयोटा गाडी संताच्या टॅक्सीला ओव्हरटेक करुन पुढे गेली.
जपानी परत बोलला "टोयोटा,व्हेरी फास्ट,मेड एन जपान".
संताला खूप राग आला पण तो शांत राहिला.
विमानतळावर पोहचल्यावर जपान्याने भाडे विचारले.
"८०० रुपये" संता म्हणाला.
"एवढे पैसे?" जपानी माणसाने आश्चर्यचकीत होउन विचारले.
तेव्हा संता म्हणाला "मीटर,व्हेरी फास्ट,मेड एन इंडीया"

(हिंदी विनोदाचा अनुवाद)

Thursday 1 May 2008

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

माय भवानी प्रसन्न झाली,
सोनपावले घरास आली
आजच दसरा आज दिवाळी
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे


जय महाराष्ट्र

जय महाराष्ट्र
* तुम्ही या चित्राचा स्वतःच्या ब्लॉगवर उपयोग करु शकता.


इंदिरा गांधी सर्वात खंबीर नेत्या- अडवाणी

लोकसभेत भारत-अमेरीका अणुकरारावर चर्चा सुरु असताना अडवाणींनी हे उद्गार काढले. इंदिरा गांधी या खंबीर नेत्या होत्या. त्यांनी अमेरीकन आणि आंतरराष्ट्रीय दबावापुदे मान झुकवली नाही. त्यामुळेच राजकिय विरोधक असलो तरी त्यांचे कौतुक करण्यात मला काहिच गैर वाटत नाही.

अडवाणी पुढे म्हणाले की, इंदिरा गांधींनी पंतप्रधान या नात्याने देशाच्या संरक्षणाला नेहमीच प्राधान्य दीले म्हणूनच त्यांनी आंतरराष्ट्रीय दबावापुढे न झुकता पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली. विद्यमान पंतप्रधानांनी कोणताही दबाव न घेता देशहिताचा निर्णय घ्यावा.

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

मे १, इ.स. १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. म्हणूनच मे १ हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्टीला, भला देखे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफ़ांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे ! ॥धृ.॥

माय भवानी प्रसन्न झाली,
सोनपावले घरास आली
आजच दसरा आज दिवाळी
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे ॥१॥

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होवु अभिमन्युचे
दूध् आईचे तेज प्रवाही
नसतुनी सळसळे !
मराठी पाउल पडते पुढे ॥२॥

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तुच रे, सिद्ध् होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ ॥३॥

शुभघडीला शुभमुहुर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी

जय जयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !! ॥४॥

मराठी पाउल पडते पुढे

गीत : शांता शेळके
संगीत : आनंदघन
स्वर : मंगेशकर कुटुंबीय

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters