Thursday 1 May 2008

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

मे १, इ.स. १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. म्हणूनच मे १ हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्टीला, भला देखे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफ़ांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे ! ॥धृ.॥

माय भवानी प्रसन्न झाली,
सोनपावले घरास आली
आजच दसरा आज दिवाळी
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे ॥१॥

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होवु अभिमन्युचे
दूध् आईचे तेज प्रवाही
नसतुनी सळसळे !
मराठी पाउल पडते पुढे ॥२॥

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तुच रे, सिद्ध् होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ ॥३॥

शुभघडीला शुभमुहुर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी

जय जयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !! ॥४॥

मराठी पाउल पडते पुढे

गीत : शांता शेळके
संगीत : आनंदघन
स्वर : मंगेशकर कुटुंबीय

No comments:

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters