Wednesday, 14 May 2008

नागरी सुरक्षा

नागरी सुरक्षा


जयपूर येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. मुंबई अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असल्याने शहराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
अशा बॉम्बस्फोटांच्या घटना टाळण्यासाठी नागरीकांनी काही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.नागरीकांनी घ्यावयाची काळजी


  • तुमच्या दुकानात किंवा परीसरात येणाऱ्या प्रत्येक बॉक्स,पॅक,बॅगची कठोर तपासणी करा.
  • एकांतात ठेवलेली आणि संशयित वाटणारी पॅकेजीस,बॅग्जबद्दल ताबडतोब जवळच्या पोलिस स्थानकास माहिती द्या.
  • आपल्या दुकान किंवा घराच्या परीसरात एखादी अनोळखी वा संशयित व्यक्ती फिरत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.
  • मालक नसलेल्या गिफ्ट बॉक्स, खेळणी यांना हात लावू नका.
  • तुमच्या परीसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख तपासून पहा.
  • जागा भाडयाने देताना त्या व्यक्तिची ओळख तपासून पहा. त्यासंबंधीत कागदपत्रे स्वतःजवळ ठेवा.

आणिबाणीच्या काळात प्रशासनाशी सहकार्य करा आणि शांतता राखा.

1 comment:

HAREKRISHNAJI said...

उपयुक्त माहिती

ShareThis

Visitors Worldwide

free counters