आज म्या वळू पाहिला...
बऱ्याच दिवसापासून वळू पाहण्याची ईच्छा होती ती आज पूर्ण झाली. वळू म्हणजे खराखुरा वळू नव्हे तर वळू मराठी चित्रपट. श्वासनंतर मराठी चित्रपटांनी कात टाकली. अनेक दर्जेदार मराठी चित्रपट तयार झाले. खरेतर दर्जेदार आणि चित्रपटाला होणारी गर्दी याचा काही थेट संबंध नसतो. हे नाटकालाही लागू पडतं. दर्जेदार नाटकांकडे लोक पाठ फिरवतात आणि सुमार नाटकांना गर्दी होते. असो तर मुख्य विषय हा की मी आज वळू पाहिला. माझा या चित्रपटाविषयी पूर्वग्रह फारच चांगला झाला होता. माझ्या सर्व मित्रांना हा चित्रपट अतिशय आवडला होता. ब्लॉग्जदुनियेत या चित्रपटाविषयी फार चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यामुळे माझ्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या पण चित्रपट पाहिल्यावर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. ह्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या तरी तरी चित्रपट सुमार नाही. चित्रपट चांगला झालाय. अर्थात आवड-निवड प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येकाची मतेही वेगळी असू शकतात.
मला तर चित्रपटातला वळू शेवटपर्यंत उपद्रवी वाटला नाही. वळू दिसायला धिप्पाड आणि गोंडस होता. मला तर त्याची दयाच येत होती. अभिनय सर्वांचा चांगला झाला आहे. अमृता सुभाष, ज्योती सुभाष, जिवन्याच्या भूमीकेतील कलाकार, निर्मिती सावंत यांच्या भुमिका छान झाल्यात. दिलीप प्रभावळकर यांना दिलेली भूमिका प्रभावी वाटली नाही.
काही लोकांनी या चित्रपटातील चांगल्या कपडयाबद्दल घेतलेला आक्षेप मला रुचला नाही. खरे तर आता गावातील लोक चित्रपटात दाखवलेल्या कपडयांपेक्षाही चांगले कपडे परीधान करतात. कपडयांच्याबाबतीत चित्रपटात काहीही चुकीचे वाटत नाही. चित्रपट मध्यांतरापर्यंत डॉक्युमेंट्रीमध्ये अडकल्यासारखा वाटला पण मध्यांतरानंतर चित्रपट वेगवान वाटला. शेवटच्या समारोपाच्या प्रसंगात अतुल कुलकर्णीला बांधलेला वेगवान फेटा मस्तच वाटला. या चित्रपटात ग्रामीण जीवनाचे चांगले चित्रीकरण केले आहे. ग्रामीण भाषा, पेहराव योग्य वाटले. अमृता सुभाषची प्रेमकहाणी आणि ज्योती सुभाषचा डुरक्यावरील जीव ह्या दोन्हींचे फार चांगले चित्रीकरण झाले आहे. अर्थात ही माझी वैयक्तीक मते आहेत. आपली मते वेगळी असू शकतात. वाचल्याबद्दल

धन्यवाद.
5 comments:
मला तर चित्रपटातला वळू शेवटपर्यंत उपद्रवी वाटला नाही. वळू दिसायला धिप्पाड आणि गोंडस होता. मला तर त्याची दयाच येत होती. ??
You did not understand the film. its about the politics played using that VALU as a toy.
" मला तर चित्रपटातला वळू शेवटपर्यंत उपद्रवी वाटला नाही. वळू दिसायला धिप्पाड आणि गोंडस होता. मला तर त्याची दयाच येत होती " या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळलेला दीसत नाही. मला असे म्हणायचे आहे की त्या सुंदर डुरक्याला जो चित्रपटात कुठेही उपद्रवी वाटत नाही त्याला का पकडणार आहेत? माझी अवस्था त्या ज्योती सुभाषसारखी झाली होती. तुम्ही म्हणता की या चित्रपटात राजकारण दाखवले आहे. या चित्रपटात सगळच अस्पष्ट आहे. विनोद दाखवायचा की राजकारण की ग्रामीण जीवन हा गोंधळ या चित्रपटात दिसतो. अर्थात पुन्हा एकदा सांगतो की ही माझी वैयक्तीक मते आहेत. माझ्या ब्लॉगवर घाबरुन अनामिक राहून प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. मी लोकशाहीला मानतो त्यामुळे नाव देवून प्रतिक्रिया द्या.
मला तर चित्रपटातला वळू शेवटपर्यंत उपद्रवी वाटला नाही. वळू दिसायला धिप्पाड आणि गोंडस होता. मला तर त्याची दयाच येत होती. ??...
Mazya mate toch tar digdarshakacha mudda ahe...Janunbujun poorna chitrapatbhar tyane kahihee kelele dakhavle nahiye, nanala shing durkyane marle ase pan dkahvle nahiye, Ek jan kahitaree mhanala mhanun doosra mhanto anee ashee sakhlee suru hote...Mazya mate ek ase udaharan mhanje Sateesh Tarene swatha kelili khodi, durkyachya navar khapvlee (banch kombdya sodlya)...
Doorkya tar ek pointer ahe tyacha vapas karoon pratyekacha mool swabhav adhorekheet kela ahe, anee sobat gramyajeevanhee.
Shivay mojki shahanee doki dakhavlee ahet na...Aja, Sakhoobai, 2-3 lahaan mule, vedee...ya sarvanch poorepoor thavook ahe ke valu nirupdravee ahe. Shevat Foreshtla pan te lakshaat ale ahe, kartavya mhanun tyane valula pakadle...anyatha to shevat vedya baila mhanala nasta, "Tai kalji nako karoos, ...to fakt ata mokla rahnaar nahee"
---------------
Far lambad lavlee me pan, mala vatate hya angane vichar karoon paha.
~Prasanna
मुळ कथानक अधिकच सूंदर आहे. माझ्या मते 'वळू' चे कथानक एका हिंदी कादंबरीवर आधारलेले आहे. काही वर्षांपुर्वी 'अक्षर' दिवाळी अंकात 'नंबरदार का निला' ह्या कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला होता. 'वळू' त्यावर आधारलेले असावेसे वाटते.
मुळ कादंबरी खुपच रंगतदार आहे. वेगळे आहे. उपकथानकांचा सुयोग्य वापर करुन 'वळू' गावाला कसा नकोसा झालेला असतो ते सहज रित्या लक्षात येते.
'नंबर...' गंभीर प्रव्रूत्तीचि आहे. 'वळू' बरोबर विरुद्ध.
'नंबर...' मधे वळू गावच्या जमिनदाराने पाळलेला. तर 'वळू' तो गावाने, परंपरेने जोपासलेला.
पण बाकी बरेच तेच. वळूचे माजणे. ढुश्या देणे. हल्ले करणे. प्रसंगी जिवे मारणे. आणि एकुणच गावाला नकोसे होणे.
तरीही चित्रपट चांगला आहे. विनोदी, खेळीमेळीत मनोरंजन करून जातो. आपल्याला आवडला.
Dhanyawad Milind Koltakar..........
Aapalya pratikriyesathi Dhanyawad.....
Post a Comment