दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे अभिनंदन
माझे ब्लॉगर मित्र आणि दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाला अकोला येथील "अंकुर साहित्य संघा'तर्फे देण्यात येणारा 2007 चा "कवी बी पुरस्कार' (महाराष्ट्र वगळून) जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांचे मराठी समुदायतर्फे अभिनंदन.संघातर्फे 10 व 11 मे रोजी चाळीसगाव येथे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. श्री. क्षीरसागर यांचा या आधी "गर्भावल्या संध्याकाळी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला असून महाराष्ट्रातील विविध साहित्यविषयक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक संघटनेचा वेणेगुरकर स्मृती पुरस्कारही त्यांना यापूर्वी मिळाला आहे. तसेच संवाद नाशिक व गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीचे कविता व कथालेखनाची पारितोषिके व मराठी विज्ञान परिषदेचा विज्ञानरंजन कथेचे पारितोषिक मिळाले आहे. ते गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे माजी कार्यकारिणी सदस्य, ताळगाव मराठी संस्कार केंद्राचे उपाध्यक्ष, कविकुल साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
2 comments:
Prakash Kshirsagaracnhya kavita kuthe vachayala milatil ?
Visit following blog
http://prakashkshirsagar.blogspot.com/
just click on marathi help
Post a Comment