जपानी मोबाइल कथा
( एन्.एच्.के. या जपानी वाहिनीवरुन प्रसारीत झालेल्या जपानी कथेचा स्वैर अनुवाद)
चॅंग एकटाच टोकियो स्टुडिओत रहायचा. अजून नोकरी नाही आणि खाण्यापिण्याचे वांदे अशात टोकियोत आणखी जागा कुठून मिळणार. सकाळी नोकरीचा शोध आणि रात्री उशिरा हात हलवत परत घरी येणे हा त्याचा नित्यक्रम ठरला होता. त्याच्या शेजारी एक सुंदर मुलगी रहायची , तिचे नाव होते टीना. दोघांची चांगली मैत्री होती. एकामेकांना एस्.एम्.एस्. , फोनवर बोलणे चालायचे.( एन्.एच्.के. या जपानी वाहिनीवरुन प्रसारीत झालेल्या जपानी कथेचा स्वैर अनुवाद)
एका रात्री चॅंग उशिरा घरी परतला त्याच्या मोबाइलवर संदेश होता.
"चॅंग मी तुझ्यावर प्रेम करते, तुझी टीना"
चॅंगला संदेश वाचून धक्का बसला. त्याच्या मनातही तसे काही नव्हते. त्याने रीप्लाय दिला.
"आपली फक्त मैत्री आहे प्रेम नव्हे."
पुन्हा संदेश आला.
"चॅंग पुन्हा विचार कर, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत."
चॅंगने उत्तर दिले
"टीना मी तुझ्यावर प्रेम करत नाही. शुभ रात्री"
चॅंगने मोबाइल टेबलवर ठेवला आणि तो फ्रेश व्हायला बाथरुममध्ये गेला. थोडयावेळाने चॅंगला एका अनोळखी नंबरवरुन संदेश आला.
"मी तुझ्यावर प्रेम करते"
चॅंगने उत्तर दिले.
"तू कोण आहेस? मला ओळखतेस का?"
"हो. मी तुला ओळखते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू माझ्यावर प्रेम करतोस ना?"
चॅंग गोंधळला. आत्ता कुठे एका संकटातून तो बाहेर आला होता. आता ही नविन कोण? चॅंगला प्रश्न पडला.
तरी पण थोडा वेळ टाइमपास म्हणून चॅंगने तिला प्रतिसाद दिला.
"ओ तर अनामिका तू तुझे नाव सांग ना"
"नावात काय आहे. मी तुझ्या वर फार प्रेम करते."
"किती?"
"तुझ्यासाठी मी माझे प्राण पण देइन."
आता जरा जास्तच होतय. असा विचार करुन चॅंगने झोपायचा निर्णय घेतला. तो झोपला आणि अचानक पाठोपाठ दहा संदेश त्याच्या मोबाइलवर आले. चॅंग खडबडून जागा झाला. सर्व संदेश त्याच नंबरवरुन आले होते. आता मात्र चॅंग वैतागला. त्याने त्या नंबरवर फोन केला आणि फोन केल्यावर जो संदेश ऐकवला गेला त्याने तर त्याची झोपच उडवली.
पलिकडून संदेश आला की "हा क्रमांक अस्तित्वात नाही.कृपया पुन्हा डायल करा."
तेवढयात चॅंगला एक नवा संदेश आला. तो एक व्हिडिओ संदेश होता. तो पाहून चॅंग उडालाच. या संदेशात त्याचेच घर होते. तो रात्री घरी आल्यापासून झोपेपर्यंतचे चित्रीकरण त्यात होते. त्याचे हात थरथरु लागले. संदेश पाठवणारी आपल्याच घरात आहे याची जाणिव त्याला झाली. भितीने तो बाहेर पळू लागला आणि मागे वळतो तर काय रक्ताने माखलेली,विचित्र चेहरा करुन टीना उभी होती. तो तिथेच बेशुध्द पडला.
दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा टी.व्ही.वर टीनाच्या आत्महत्येची बातमी दाखवली जात होती.
6 comments:
अप्रतिम वाचताना अंगावर काटा उभा राहिला.
तुझा मित्र नितेश
ब्लॉगवाणीवरुन येथे आलो. कथा मस्तच आहे. आपला ब्लॉग ब्लॉगवाणीवर येण्यासाठी काय करावे?
- उमेश जोशी
नितेश आणि उमेश आपल्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
नितेश आणि उमेश आपल्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
this is topic is very good for all my maharastarian
धन्यवाद प्रशांत.
Post a Comment