सध्याच्या जगात सर्वात मोठे प्रदूषण कोणते? माझ्या मते विचारांचे आणि आचारांचे प्रदूषण हे सध्याच्या जगातील सर्वात मोठे प्रदूषण आहे. जिकडे पहाल तिकडे हे प्रदूषण आहे. विचार एक आणि आचार वेगळाच. दिखावू विचार काय कामाचे? आपले नेते पहा ना फार मोठी मोठी आश्वासने देतात. पाळतात किती? पुरोगाम्यांची तीच परीस्थिती. महापुरुषांच्या विचारांची होळी करण्याचा विडाच काहीजणांनी उचलला आहे.महापुरुषांचे भिंतीवर लावलेले फोटो हे दिखाव्यासाठीच असतात. जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना भाषणे द्यायची आणि मग सगळे विसरुन जायचे.
आपण जे बोलतो ते प्रत्यक्षात किती आणतो? भ्रष्टाचारावर दररोज टीका होते, सर्वचजण टीका करतात, पण भ्रष्टाचार कमी होत नाही। मी स्वतः जातियतेवर नेहमी कठोर टीका करतो पण मी स्वतः मागे हटलो नाही। लाख विरोध असतानाही मी आंतरजातिय विवाह केला आहे. माझ्या मते जोपर्यंत आपण स्वतः पुढे येउन स्वतःचे विचार आचारात रुपांतरीत करत नाहीत तोपर्यंत जग बदलण्याचे स्वप्न बघण्यात अर्थ नाही. महापुरुषांचे विचार जर आपल्या बुध्दीला पटत असतील तर ते जरुर आचरणात आणावे. केवळ बोलुन काहीच फायदा नाही.
बाबा आमटे,मदर तेरेसा,महर्षी कर्वे,गाडगेबाबा यासारखे अनेक आदर्श आपल्याकडे आहेत ज्यांनी नेहमी आपले विचार सत्यात उतरवले. "अलसस्य कुतो विद्या?" तर मग चला चांगल्या विचारांचा संकल्प करा आणि हे विचार आचरणात आणा.
4 comments:
just perfect
धन्यवाद !
Thank u harekrishnaji...
great post ...
keep it up...
rohan surve,pune
Post a Comment