आत्महत्या चालूच
अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या जादुई बजेट नंतर देखील विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत. बजेटनंतर तब्बल ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये वाचली. एवढया मोठया प्रमाणावर आत्महत्या होताना सरकारने कोणते प्रयत्न केले याचे उत्तर सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहीजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राजकीय चष्म्यातून न पहाता माणुसकिच्या दृष्टीने पहायला हवे.
सर्व पक्षांनी एकत्र येवून काम करायला हवे. कार्यकर्त्यांची मोठी फौज मेळावे आणि आंदोलनात वापरण्यापेक्षा त्यांचा उपयोग शेतकऱ्यांच्या पुर्नवसनात व्हावा. परदेशात एका मृत्यूची देखील दखल घेतली जाते. येथे मात्र शेकडो मरुन देखिल आपले उपाय कमी पडतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय सरकारलाच आहे पण प्रश्न अजुनही गंभीर आहे. विदर्भातील आत्महत्या हा महाराष्ट्राला आणि पर्यायाने मराठी नगरीला लागलेला कलंक आहे.
गेल्या तीन दिवसात चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारकडून मला अपेक्षा नाहीत. पण ईश्वराकडे एक प्रार्थना करु इच्छीतो.
"हे सर्व शक्तिमान ईश्वरा विदर्भातील शेतकऱ्यांना या कठीण परिस्थितीशी लढण्याचे धैर्य आणि सामर्थ्य दे."
- वामन परुळेकर
3 comments:
हा फ़ार गंभीर प्रश्न आहे. मी माझ्या ब्लॉगमध्ये सुध्दा या प्रश्नाला वाचा फ़ोडलेली आहे.
हो प्रश्न फारच गंभीर आहे. प्रत्येकाने आपली मते मांडावीत. ब्लॉगर्सचा थोडासा या विषयाकडे दुर्लक्ष झाला आहे असे मला वाटते. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
शेती हे क्षेत्र सध्या मोठी गंभीर समस्या झाली आहे. अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी, अमलबजावणीला वेळ लागणार आहे. तो पर्यंत कर्जपीडीत शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी स्थानिक पातळीवर जबाबदार घटकांनी प्रयत्न चालू ठेवणे आवश्यक आहे.
Post a Comment