१७३९ साली आजच्याच दिवशी नादिरशहाने दिल्ली वर कब्जा केला आणि दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटली आणि इराणला पाठविली. मोठया स्वरुपात न भरुन येणारी वित्तहानी झाली. हे मयुरासन सतराव्या शतकात मुघल बादशाह शाहजहान साठी तयार करण्यात आले होते. हे रत्नजडीत मयुरासन दिवान-ए-आम मध्ये ठेवण्यात आले होते. या मयुरासनाची तत्कालिन किंमत ४ करोड ते १० करोडच्या दरम्यान होती. दिल्लीचा पाडाव झाल्यानंतर नादिरशह मे १७३९ला परत निघाला. फेब्रुवारी १७३९ ते मे १७३९ दरम्यान तो भारतात होता.
मयुरासन
नादिरशहा हा इराणी साम्राज्याचा पाया होता. काही इतिहासकार त्याची तुलना नेपोलिअनशी करत असत. त्याने बलाढय साम्राज्य उभे केले होते. १७३८ च्या अखेरपर्यंत हे साम्राज्य कंदहार पर्यंत पसरले होते. नादिरशाहचा डोळा मुघल हिंदुस्थानवर होता. काबूल,गजनी करत नादिरची विशाल सेना लाहोरला पोचली. हिच योग्य वेळ आहे हे नादिरने ओळखले होते. मराठा साम्राज्याने मुघल साम्राज्याला खिळखिळे केले होते. अशा स्थितीत मुघलांचा पाडाव शक्य होता. फेब्रुवारी १७३९ ला कर्नाल मध्ये मुघलांचा पाडाव झाला. मोहम्मद शाहला अटक झाली. नादिरच्या सेनेने दिल्लीत प्रवेश केला. मुघल बादशाह अटकेत गेल्याची बातमी वाऱ्यासारखी देशात पसरली. बदला म्हणुन काही भारतीय राजांनी पर्शियन सेनेवर हल्लाबोल केला. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले. नादिरला हे कळले, तेव्हा त्याने आपल्य सेनेला बदला घ्यायचा हूकुम दिला. २२ मार्च १७३९ तो काळा दिवस दिल्लीत बदल्यापोटी एका दिवशी २०००० ते ३०००० लोकांची हत्त्या झाली. मुघल बादशहा मोहम्मद शहा ने नादिरची माफी मागितली. नादिरने सैन्याला थांबण्याचे आदेश दिले.
बदल्यात बादशहाने शाही खजान्याच्या चाव्या नादिरकडे सुपूर्द केल्या. नादिरने मयुरासन,कोहीनूर,दर्यानूर,असंख्य रत्ने लुटली. मे १७३९ ला नादिर इराणकडे निघाला तेव्हा त्याच्या बरोबर हजारो हत्ती,घोडे आणि उंट होते. लुटीचा माल एवढा होता की इराण मध्ये तीन वर्षे सर्व कर माफ होते.
संदर्भ-
द ज्वेल्स ऑफ इराण -- http://www.geocities.com/Pentagon/Base/1406/jewel/imperialjewels.html
नादिर साम्राज्य -
http://www.angelfire.com/empire/imperialiran/golestan.html
No comments:
Post a Comment