होळी चे बळी
काल लोकलमध्ये घडलेली घटना वाचली आणि अंगावर शहारा उभा राहीला. केमिकलमिश्रीत रंगाचा फुगा बसून पुनीत नामक एका तरुणाचा एक डोळा निकामी झाला आहे. केमिकलयुक्त रंग केवळ डोळ्यांनाच नव्हे तर संपूर्ण मानवी शरीराला धोकादायक मानला जातो. डोळा हा सर्वात महत्त्वाचा अवयव त्याची हानी झाली तर संपूर्ण आयुष्य अंधारात घालवावे लागेल. त्यामुळे रंग उधळताना तो रंग केमिकलयुक्त तर नाही ना याची खात्री करुन घ्यावी.खरे तर असे घृणास्पद प्रकार दरवर्षी घडत असतात . फक्त त्यांचे स्वरुप वेगवेगळे असते. एखाद्याच्या इच्छेविरुध्द रंगवणे हा सुध्दा गुन्हाच आहे. अनोळखी ठिकाणी कोणता रंग वापरला आहे हे आपल्याला माहिती नसते. तेथे धोका अधिक असतो. होळीच्या निमित्ताने काही समाजकंटक वाहनधारकांना रस्त्यावर अडवून लुटतात. कधी स्त्रियांवर,कॉलेजकुमारींवर त्यांच्या इच्छेविरुध्द रंग उधळले जातात. हे सर्व गैरप्रकार थांबले पाहिजेत आणि त्यासाठी सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे.
चला केमिकलमुक्त रंगांचा वापर करुया. एखाद्याच्या इच्छेविरुध्द रंगवणे बंद करुया.
होळीच्या शुभेच्छा
No comments:
Post a Comment