Thursday 31 January 2008

माझी शिर्डी यात्रा

बरेच दिवस आईच्या मनात होते कि शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला जाउन यावे. पण योगच नव्हता. अखेर आम्ही २९ डिसेंबरला जायच ठरवल. मी आणि माझी बायको विस्मयी २४ला गावात(वेंगुर्ल्याला) पोहचलो.


दिनांक २९ उजाडला, आम्ही पहाटे पाचला उठलो कारण सकाळी ७ची वेंगुर्ला-अक्कलकोट गाडी गाठायची होती. अखेर वेंगुर्ला-अक्कलकोट जलद बस मिळाली. कोल्हापूरला उतरुन बस बदलायची होती. वेंगुर्ला-कुडाळ २० किमीच अंतर पार करत गाडी आता मुंबई-गोवा महामार्गावरुन धावत होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या बाजुचा परीसर निसर्गरम्य. मन प्रसन्न होउन जाते. हिरवीगार वृक्षवल्ली, हिरवगार शेत आणि अधुन मधुन दिसणाऱ्या छोटया छोटया नद्या. सार काही अवर्णनीय.


कणकवलीच्या पुढे घाट रस्ता सुरु झाला. हा गगनबावडा घाट सह्याद्रीतून जाणारा धोकादायक घाट समजला जातो.अरुंद वळणावळणाचा रस्ता भितीदायक वाटत होता. खिडकीतुन सह्याद्रीची विविध रुप दिसत होती. हातातल्या कॅमेराने मी ती दृश्ये टिपत होतो. विलोभनिय उंच कडे, खोल दरी, मागे लहान होत चाललेला रस्ता. अगदी घाट संपता संपता दुर उंचावर गगनगिरीवर महाराजांचा मठ दिसतो. घाट संपल्यावर बस चहासाठी गगनबावडा बसस्थानकावर दहा मिनीटे थांबली. बस स्थानकावर एक छोटस हॉटेल होत, मस्त वडा-पाव चा वास येत होता, माझ्या तोंडाला पाणी सुटल. तीन वडा- पाव पार्सल घेतले गाडीत खायला. बसस्थानकावर मी शिरा खाल्ला. चविष्ट शिरा. उत्तम.. वडे पण बेस्ट होते. कोल्हापुरी मोठे वडे चविला पण चांगले असतात.

आता बस कोल्हापुरच्या मार्गाला लागली. हा रस्ता फारच खराब होता. उसाच्या वाहतुकीमुळे असेल, बस सारखी हलत होती. कोल्हापुर जिल्ह्यातील छोटी-मोठी गावे पाहत होतो. उस आणि साखर कारखाने या दोनच गोष्टी दिसत होत्या. सहकार या भागात बराच रुजलेला. येथील लोकही कष्टाळु आहेत. तसे कोल्हापूरला मी खुपदा गेलोय. कोल्हापुर म्हटल की आठवते ती झणझणीत कोल्हापुरी मिसळ,लाल रस्सा,कोल्हापुरी रंकाळावरची भेळ आणि सगळयात लोकप्रिय कोल्हापुरी चप्पल , आजकाल फार कमी लोकांच्या पायात दिसते आणि फार कमी लोग जे चप्पल घालतात त्यांना अडवल जातय(मराठी कलाकारांबरोबर घडलेला प्रकार).

अचानक आमची बस थांबली. समोर उसांनी भरलेली बैलगाडयांची रांग रस्ता ओलांडत होती. ह्या बैलगाडया कोल्हापुरच वैशिष्ट. आमच्या कोकणातुन बैलगाडया जवळजवळ हद्दपार झाल्यात पण येथे अजुन टिकून आहेत. या बैलगाडया पार झाल्यावर पुढे एका गावात जनावरांचा बाजार भरला होता. अगदी रस्ताजवळ हा बाजार भरला होता. त्यामुळे गाडी एकदम हळु चालत होती. गायी,बैल,म्हैशी,रेडा असे सगळे शेतकऱ्यांच्या उपयोगातले प्राणी बाजारात उपलब्ध होते. हे सगळ बघुन मला जुन्या मराठी चित्रपटातील दृश्य आठवली. पण बैलाचा आणि माझा ३६ आकडा मला अजिबात लाज वाटत नाही हे सांगायला की मी बैलाला घाबरतो. त्याचे झाले असे , लहानपणी एकदा रस्त्यावरुन जाणाऱ्या बैलाची शेपटी पकडण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळी त्या रागीट बैलाने जोरात शेपटी माझ्या तोंडावर मारली आणि मी लोटांगण घातले. त्यावेळी बरच खरचटल होत. तेव्हापासून बैल दिसला की चार हात लांबुनच जातो.

क्रमशः

Monday 28 January 2008

अप्रतिम चित्रपट




परवाच
तारे जमीन पर बघितला. अप्रतिम चित्रपट. हजारात एखादा चित्रपट असा चांगला तयार होतो. अमिर खाननेपण जिव ओतुन दिग्दर्शन केलय. लहान मुलांच्या प्रश्नांवर आधारीत हा चित्रपट खराखुरा ह्रदयस्पर्शी आहे. मागेमराठीत श्वास हा दर्जेदार चित्रपट आलेला. त्यानंतर तेवढयाच दर्जाचा हा मी पाहिलेला दुसरा चित्रपट. आपल्या देशातलहान मुलांचे आणि त्यांच्या प्रश्नांवर आधारलेले फार कमी चित्रपट तयार होतात आणि तयार झालेच तर फारसेचालत नाहित त्यामुळे या चित्रपटांचे यश कौतुकास्पद वाटते.

Friday 25 January 2008

मराठी भाषा संकटात?

आज सकाळी एका ब्लॉगवर वाचले की आपली मराठी भाषा आता संपत चालली आहे. रोज वर्तमानपत्रातही अशाचबातम्या छापून येतात. कधी कुठल्यातरी शहरात विचारवंत एकत्र बसून मराठीवर विचारमंथन करतात. रोज हेअसच चालु आहे. खरच मराठी संपणार आहे का? मला विचाराल तर मुळीच नाही. नकारार्थी विचार करत बसुनचालणार नाही. आपण सर्व मराठी बांधवांनी ठरवल तर मराठी कशी संपेल ?आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो , पणआपण किती मराठी बोलतो? किती मराठी भाषिक चित्रपट, मालिका पहातो? किती मराठी पुस्तके वाचतो ? सुरुवात आपल्यापासुनच केली पाहिजे.

आणखी महत्त्वाच म्हणजे आपल्याला महिती असेलच की इंग्रजी एवढी लोकप्रिय का आहे ? कारण ती सर्वसमावेषक भाषा आहे. मी कुठतरी वाचल आहे की त्या भाषेत ७०% ईतर भाषेतील शब्द आहेत. आपल्यालाही मराठी भाषा व्यापक करावी लागेल. याच्यावर तज्ञांनी जरुर विचार करावा.

आजचा सुविचार

भावनांवर संयमाचा लगाम मनुष्याला यशस्वी करतो.

Thursday 24 January 2008

मच्छिंद्र कांबळी

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते, प्रसिद्ध नाट्यनिर्माते, मालवणी भाषा सातासमुद्रापार पोचविणारे मच्छिंद्रकांबळी वय ५८ यांचे गेल्या वर्षी दि. ३०/०९/२००७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरण या पहिल्याच नाटकाद्वारे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. अस्सल मालवणी बोलीतले लोकनाट्याच्या धर्तीचे हे नाटक मैलाचा दगड ठरले. कांबळी यांचा अभिनयाचा ठसाखऱ्या अर्थाने उमटला तो, "वस्त्रहरण'मधील तात्या सरपंच या भूमिकेने. "वस्त्रहरण' या नाटकाचे ४८९९ प्रयोग झाले.
 
त्यानंतर पांडगो इलो रे , घास रे रामा , वय वर्ष पंचावन्न , भैय्या हातपाय पसरी , येवा कोकण आपलाच असा , माझा पती छत्रीपती अशी अनेक नाटके त्यांनी आपल्या भद्रकाली प्रोडक्शन या नाटयसंस्थेमार्फत अनेक वर्ष चालवली.
 
मच्छिंद्र कांबळींच नाटक वस्त्रहरण मी पहिल्यांदा तळवडेत पाहिले आणि मी बाबुजींचा फॅन झालो. जिवंतअभिनय आणि योग्य टायमिंग हेच त्यांच्या यशाचे रहस्य असावे. मच्छिंद्र कांबळी खासदार पदासाठी निवडणुकीला उभे होते त्यावेळी प्रचारासाठी त्यांनी तळवडेला धावती भेट दिली होती आणि खास मालवणीतुन भाषण केले होते. ते भाषणही माझ्या स्मरणात आहे.

Sunday 20 January 2008

मराठी आरत्या


सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्‍ताफळाची ॥ १ ॥

जय देव जय देव जय मंगळमुर्ती ।
दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥ धॄ. ॥

रत्‍नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥ जय. ॥ २ ॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुडं त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावें, सुरवर वंदना ॥ जय. ॥ ३ ॥

ओजस्वी मानवतावादी विचार.

सर्वांवर प्रेम करा ही माझी शिकवण आहे. आणि ती 'परमात्मा सर्वव्यापक असून सर्वत्र समभावे विद्यमान आहे' या वेदान्तातील सत्यावर आधारलेली आहे.

- स्वामी विवेकानंद (कुंभकोणम व्याख्यान)

अणुऊर्जा करार -- तुमचे मत मांडा


भारत आणि अमेरिका यांच्यात होऊ घातलेल्या अणुकराराला डाव्यांचा टोकाचा विरोध आहे. या करारात भारताचा बराच फायदा आहे हे उघड आहे. काही मुद्दे वगळल्यास भाजपा ही करारस पाठींबा देइल असे वाटते. मनसे नेते राज ठाकरे यांनी करारास खुलेपणाने पाठींबा देण्याचे आवाहन सर्व नेत्यांना केले आहे. "जगातील कोणत्याही व्दिपक्षीय करारात फक्त एकाच पक्षाला फायदा होईल अशीच कलमे असावीत असा हट्ट धरणे हास्यास्पद असते" असे राजना वाटते. या पार्श्वभुमीवर आपले काय मत आहे ते निर्भीडपणे मराठीत मांडा.

देवनागरीत कस लिहाव??

देवनागरीत कस लिहाव??

असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? उत्तर सोप आहे. खाली दीलेल्या संकेतस्थळावर आपण देवनागरीत कस लिहाव ते शिकू शकता..

http://www.classifieds.co.in/hindi.html

अजून काही माध्यमे मराठी लिखाणासाठी...

http://www.maayboli.com/jslib/html/dvedt.html
http://www.quillpad.com/marathi/
http://www.baraha.com/baraha.htm

संक्रांत-बलिदानाचा दिवस

Written on 15th jan 2008

आजचा दिवस बलिदानाचा दिवस. महाराष्ट्रात अस एक घर उरल नव्हत जिथे कोणी आपले प्राण दिले नसतील. अखंड महाराष्ट्र ज्वालांनी वेढला. दत्ताजी शिंदे आणि मराठयांची कत्तल झाली. महाराष्ट्रावर आणि मराठी सत्तेवर दुःखाचा डोंगर कोसळला. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट मराठयांच्या रक्ताने माखुन गेला. परकिय सत्तेपासून भारत भूमीचे रक्षण करताना मराठी लोकांनी दिलेले बलिदान आज देश विसरुन गेलाय. पानिपत हा तर काही लोकांना विनोदाचा विषय वाटतो. पण लक्ष्यात असु द्या महाराष्ट्रात जेव्हा निर्भयपणे आपले पुर्वज सक्रांत साजरी करत होते तेव्हा लक्ष मराठी सेना आपल रक्षण करण्यासाठी उत्तरेत अब्दालीशी दोन हात करत होती.

- वामन परुळेकर

माझ्या आवडत्या मराठी कविता

मराठी कविता आणि गाणी अशी दोन वेगळी सदरं सुरु केलेली आहेत.कविता अन्य कवीची असल्यास ती ह्या सदरात पाठवताना माहिती असल्यास नामोल्लेख जरुर करा. चला तर जास्तीत जास्त दर्जेदार कविता लिहुया, पाठवूया. आणि वाचन संस्कृती वाढवूया.
माझा ऑरकुटवरील मराठी समुदाय

http://www.orkut.com/Community.aspx?cmm=38130819
आपल स्वागत आहे !
Welcome to मराठी (MARATHI).

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters