Sunday, 20 January 2008
मराठी आरत्या
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥ १ ॥
जय देव जय देव जय मंगळमुर्ती ।
दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥ धॄ. ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥ जय. ॥ २ ॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुडं त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावें, सुरवर वंदना ॥ जय. ॥ ३ ॥
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment