
परवाच तारे जमीन पर बघितला. अप्रतिम चित्रपट. हजारात एखादा चित्रपट असा चांगला तयार होतो. अमिर खाननेपण जिव ओतुन दिग्दर्शन केलय. लहान मुलांच्या प्रश्नांवर आधारीत हा चित्रपट खराखुरा ह्रदयस्पर्शी आहे. मागेमराठीत श्वास हा दर्जेदार चित्रपट आलेला. त्यानंतर तेवढयाच दर्जाचा हा मी पाहिलेला दुसरा चित्रपट. आपल्या देशातलहान मुलांचे आणि त्यांच्या प्रश्नांवर आधारलेले फार कमी चित्रपट तयार होतात आणि तयार झालेच तर फारसेचालत नाहित त्यामुळे या चित्रपटांचे यश कौतुकास्पद वाटते.
No comments:
Post a Comment