Sunday 29 March 2009

लोकसभा २००९

लोकसभा २००९
हरेकृष्णाजी तुम्ही चांगला विषय निवडलात. हरेकृष्णाजी हे मराठीतील आघाडीचे ब्लॉगधारक आहेत. नवीन मंत्रीमंडळ कोणत्याही पक्षाचे असो त्यात विचारवंत आणि तज्ञ लोकांचा भरणा असणे गरजेचे आहे. प्रामाणिक लोकांची देशाला गरज आहे. देशाचे प्रांतवाद ,धर्मवाद,जातीवाद यामुद्यांवर विभाजन करणे सोपे आहे पण देश जोडणे फार कठीण आहे. काही वर्षांपुर्वी भारत जोडो अभियानाने एक प्रयत्न केला होता. देश अखंड ठेवण्यासाठी अशा अभियानांची गरज आहे. विकासाचा मुद्दाही महत्वाचा आहे. सुरक्षेचा मुद्दा पण महत्वाचा आहे. मी काही नेत्यांची नावे जी मला योग्य वाटली ती देत आहे. अन्य ब्लॉग धारकांनी जरुर नावे सुचवावीत.

श्री. डॉ.मनमोहन सिंग
श्री. डॉ..पी.जे.
श्री. शाहनवाज हुसेन
श्री. सुरेश प्रभु
श्री. प्रो. बासुदेव बर्मन (सी.पी.आय.एम्.)
श्री.डॉ.सुजन चक्रवर्ती (सी.पी.आय.एम्.)
श्री. प्रणव मुखर्जी
श्री. अंबुमणी रामदास
श्री. पी. चिदंबरम
श्री. प्रफुल्ल पटेल
श्री. प्रकाश करात
श्री. शीला दिक्षित (खासदार नाही पण मंत्री होण्यास लायक)
श्री.अभिषेक सिंघवी
श्री.डॉ.तुषार चौधरी

तसेच २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांना महत्व द्यावे असे तुम्हाला वाटते ? आपली मते जरुर नोंदवा. हरेकृष्णाजी आपणही आपली मते जरुर मांडा.

5 comments:

Anonymous said...

thushaar chaudhari kuthale aahet????

kadhi aikal nahi

Vishal Manjarekar said...

corruption saglyat mahatvacha mudda aahe...

Waman Parulekar said...

विशाल धन्यवाद.
हो भ्रष्टाचार हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यावर लक्ष देणे फार महत्वाचे आहे. भ्रष्टाचार हे मूळ कारण आहे.

Minanath Dhaske said...

Wamanrao...

Krupaya maza blog paha http://minanath.blogspot.com jar yogyatecha watala, tar tumachya blog var tyachi link dya.

Dhanyawaad

Waman Parulekar said...

धन्यवाद मिनानाथ माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल. मी आपला ब्लॉग पाहिला आहे. फार छान आहे. आपली व्यंगचित्रे मला आवडली.

-वामन परुळेकर

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters