Friday, 25 June 2010

धन्यवाद

धन्यवाद मित्रांनो, तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आज या ब्लॉगच इंटरनॅशनल रॅंकींग टॉप टेन मद्ये आल आहे. टॉप ऑफ ब्लॉगच्या ताज्या रॅकींगमधे मराठी समुदाय ब्लॉगला १० वा रॅंक मिळाला आहे. असाच प्रतिसाद देत रहा. धन्यवाद.

Tuesday, 15 June 2010

घन घन माला नभी दाटल्या


रत्नागीरीत मान्सुनच जोरदार आगमन झाल आहे. गेले दोन दिवस रत्नागीरीत मान्सूनचा पाउस पुर्ण सक्रिय झालाय. गडगडणाऱ्या विजा आणि धुंद करणार वातावरण मन मोहुन जात. अशा या मस्त पाऊसात मी भजी आणि सोबत गरम गरम चहा पितोय आणि मंद आवाजात "घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा" हे माझ सर्वात आवडत गाण पण चालु आहे. अहा.. मस्तच. मी शब्दात नाही सांगु शकत. अरे समोरच वीज पडली. अगदी लाइव्ह ब्लॉग लिहीतोय मी. चला आता लाइट जाइल.

Enjoy mansoon..

हास्य-विनोद - 10एका भिकाऱ्याच लग्न होत. लग्नात भिकाऱ्याची बायको उखान्यात नाव घेते.

सोन्याच्या पलंगाला चांदीचा पाय

सोन्याच्या पलंगाला चांदीचा पाय

भिकाऱ्याचं नाव घेते वाड ग माय.

- source SMS

माहितीपर संकेतस्थळे (ब्लॉगींग टीप्स) भाग - 15

माहितीपर संकेतस्थळे (ब्लॉगींग टीप्स) भाग - 15

तुम्ही जर ब्लॉगरचा उपयोग करून ब्लॉगीँग करत असाल तर तुम्ही नेव्हिगेशन बार पाहीलाच असेल. या बारचा तसा काहीच उपयोग होत नाही. हा बार कायम स्वरूपी काढुन टाकायची एक ट्रिक आहे. जे लोक डोमेन नेम वापरतात त्यांना या ट्रिक ची गरज नाही. जे ब्लॉगर टेम्पलेट वापरतात त्यांना ही ट्रिक उपयोगी पडेल.

१) ब्लॉगरला Log in व्हा.

२) डैशबोर्ड वर क्लीक करा. त्यानंतर ज्या ब्लॉगचा नेव्हिगेशन बार हाइड करायचा असेल त्या ब्लॉगच्या डीझाइनवर क्लीक करा.

Friday, 11 June 2010

शनिवारवाडा, पुणे

शनिवारवाडा, पुणे

युनिअन कार्बाइड : भोपाळ १९८४

युनिअन कार्बाइड : भोपाळ १९८४

दि.२ डिसेंबर १९८४, भोपाळ आणि भारताच्या इतिहासातील काळा दिवस. २ डिसेंबरच्या मध्यरात्री युनिअन कार्बाइडच्या प्रमुख प्लांन्ट मधुन एम् आय् सी गॅस आणि टोक्सीन्सची गळती झाली. भोपाळमध्ये मृत्युने थैमान घातल. सरकारी आकडेवारीनुसार लगेच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 3000 ते 4000 च्या दरम्यान होती. घटनेनंतर पहिल्या आठवडयात जवळजवळ 8000 लोकांनी आपला जीव गमवला होता. पुढच्या काही महिन्यात 10000 ते 20000 लोकांनी आपला जीव गमावला. 1,00,000 ते 2,00,000 लोकांना कायम स्वरुपी इजा झाल्या. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हे संकट एवढ भयानक होत की कल्पना करण ही शक्य होत नाही. 2000 जनावर मृत्युमुखी पडली. झाडांवरची पानही पिवळी होउन गळून पडली. हॉस्पीटलमधील स्टाफला या घटनेला कस सामोर जायच याच कोणतही प्रशिक्षण दिलेल नव्हत.

ShareThis

Visitors Worldwide

free counters