Tuesday, 7 April 2009

भारनियमन कधी बंद होणार??

भारनियमन कधी बंद होणार??

लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार चालू आहे. प्रत्येक पक्ष वारेमाप आश्वासने देत आहे. 2 रुपयात गहु काय आणि राम मंदिर काय आश्वासनांची कमी नाही . पण सर्वात मह्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजेच विजेच्या मुद्द्यावर नेते स्पष्ट बोलत नाहीत. गेल्या 5 वर्षात वीजेचा प्रश्न सुटावा यासाठी आपल्या उमेदवाराने कोणते प्रयत्न केले ? विजेचा प्रश्न सुटावा यासाठी कोणते प्रयत्न तो करणार आहे हे जाणुन घेतले पाहिजे. कडाक्याच्या उन्हाळ्यात जेव्हा दुपारी 3 तास वीज जाते तेव्हा कळते की वीजेचा प्रश्न किती गंभीर आहे. जनरेटरचा वापर करणाऱ्या आणि वातानुकुलीत खोलीत बसणाऱ्यांना ह्या प्रश्नाची गंभीरता कळणार नाही. सर्व पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात या प्रश्नावर तरतुदी सुचवाव्यात आणि हा प्रश्न कायम स्वरुपी सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच सामान्यांची अपेक्षा आहे.

3 comments:

Aniket said...

वामनराव हा प्रश्न सुटण्यासाठी दृढ राजकिय इच्छाशक्तीची गरज आहे..

अनिकेत

प्रितम सामंत said...

स्वतः विज निर्मिती करणे योग्य ठरेल. त्यासाठी बायोगॅसचा वापर करता येइल. प्रितम सामंत

Pranav Dev said...

loadshading is major problem of Maharashtra.. but only ruling party is not responsible for this.. to build power project u need long period plans... other ruling parties which r in now opposition also responsible for current situation.. we need 4-5 mega power projects in Maharashtra to fulfill demamnd..

- Pranav Dev

ShareThis

Visitors Worldwide

free counters