Monday, 13 October 2008

चंद्रमुखी....रजनी....लकालकालकालका....

चंद्रमुखी....रजनी....लकालकालकालका....

ज्या ज्या प्रेक्षकांनी रजनीचा चंद्रमुखी पाहिला आहे त्यांच्या डोक्यात रजनीचा "लकालकालकालका" हा डायलॉग नक्कीच फिक्स बसला असणार. २००५ साली चंद्रमुखी ने चित्रपट उद्योगात वादळ निर्माण केले होते. चेन्नाईत सलग तिनशे दिवस या चित्रपटाने व्यवसाय केला होता. पहिल्या काही दिवसातच चित्रपटाने ८०कोटीचा गल्ला जमा केला होता.या चित्रपटाने भारतातच नव्हे तर परदेशातही चांगला व्यवसाय केला. जपानमध्ये या चित्रपटाला अफाट यश मिळाले. असे म्हणतात की या चित्रपटाच्या प्रभावामुळे अनेक जपानी मुलींनी तमिळ मुलांशी लग्ने केली. या चित्रपटाचा प्रभाव एवढा होता की जसे शोलेचे संवाद आजही अन्य चित्रपटांत व जाहिरातीत वापरले जातात तसेच चंद्रमुखीचे काही संवाद अन्य चित्रप्टात वापरले गेले. राघव यांचा सुप्रसिध्द तेलगु चित्रपट स्टाईल मध्ये रजनी लकालका संवाद वापरला गेला. त्यावेळी रजनीकांत म्हणजेच शिवाजीने या चित्रपटासाठी १५ कोटी घेतले. त्यावेळी हे मानधन कोणत्याही बॉलीवूड कलाकाराला मिळणाऱ्या मानधनापेक्षा अधिक होते. जॅकी चेन नंतर आशियात सर्वाधिक मानधन घेणाऱ्यात रजनीचा दुसरा नंबर होता.
चंद्रमुखीची कथा अन्य भारतीय चित्रपटांपेक्षा वेगळी होती. गंगा आणि तिचा पती सेंथील हे कोणतीही अंधश्रध्दा पाळत नसतात. ते गावातला एक राजवाडा विकत घेतात. लोकांची अशी अंधश्रध्दा असते की त्या राजवाडयात भुत राहतात. त्यामुळे त्या राजवाड्याकडे कोणीही फिरकत नसतं. कालांतराने गंगाला त्या राजवाडयाची खरी कथा कळते. गंगा स्वतःलाच कथेतील नर्तिका समजू लागते. चित्रपटात कथेची मांडणी फार सुंदर झाली आहे. विनोद,हाणामारी,सस्पेन्स,हॉरर अशा सर्व गोष्टी या चित्रपटात होत्या. १५० वर्षांपूर्वी घडलेली कथा आणि त्या कथेचा नायिका गंगा हिच्यावर पडलेला प्रभाव, दुसरी नायिका दुर्गावर असलेला संशय ह्या सगळ्याच उत्तम चित्रीकरण झाले आहे. चंद्रमुखी ज्या कथेवर बेतला आहे त्याच कथेवर एक मल्याळम चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले होते. त्या यशापासून प्रेरणा घेउन पी.वासू यांनी चंद्रमुखी तयार केला. चंद्रमुखीला मिळालेल्या प्रचंड यशामुळे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी तो हिंदीत करायचा ठरवला. भुल-भुलैया या नावाखाली तीच कथा घेउन नवा चित्रपट तयार केला. "हरे राम हरे राम हरेकृष्णा हरे राम" हे गाणे प्रचंड गाजले. चित्रपटानेही चांगला व्यवसाय केला. 

अक्षयकुमार आणि प्रियदर्शन या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीला आणखी एक सुपरहीट चित्रपट दिला. अशाप्रकारे एकाच कथेवर तीन वेगवेगळ्या भाषेत तीन वेगवेगळे सिनेमा प्रचंड गाजले. भुल-भुलैयाच्या यशानंतर चंद्रमुखी हिंदीत डब करुन प्रदर्शीत झाला. पण चित्रपट डब असल्यामुळे अपेक्षीत यश प्राप्त करु शकला नाही. हिंदीत भुल-भुलैयाच सरस ठरला. मात्र जर तमिळ चंद्रमुखी आणि हिंदी भुल भुलैयाची तुलना केली तर सरस कोण हे सांगणे कठीण होइल.आशियाइ प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून तमिळ चंद्रमुखी मध्ये कु-फु कराटे फाइट सीन ठेवले आहेत ते भुल-भुलय्यात नाहीत. भुलभुलय्या विनोदी अंगाने जातो पण यात हॉररही तेवढाच जबरदस्त आहे. भुल-भुलैयातील अवनी म्हणजेच विद्या बालन हिची भुमिका अप्रतीम वठली आहे. चित्रपटात ती ज्यावेळी मोंजोलीकाच रुप धारण करते तेव्हा ती खरच भयानक वाटते. तमिळ चंद्रमुखीतील गंगा (प्रसिध्द अभिनेत्री नगमाची बहिण ज्योतीका ) तेवढी भयानक वाटत नाही. रजनी आणि अक्षयची तुलना होवू शकत नाही. रजनीकांत अभिनयसम्राट तर अक्षय हिंदीतला सुपरस्टार. वेळ मिळाला तर आपणही तिन्ही चित्रपट जरुर पहा.

No comments:

ShareThis

Visitors Worldwide

free counters