युनिअन कार्बाइड : भोपाळ १९८४
दि.२ डिसेंबर १९८४, भोपाळ आणि भारताच्या इतिहासातील काळा दिवस. २ डिसेंबरच्या मध्यरात्री युनिअन कार्बाइडच्या प्रमुख प्लांन्ट मधुन एम् आय् सी गॅस आणि टोक्सीन्सची गळती झाली. भोपाळमध्ये मृत्युने थैमान घातल. सरकारी आकडेवारीनुसार लगेच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 3000 ते 4000 च्या दरम्यान होती. घटनेनंतर पहिल्या आठवडयात जवळजवळ 8000 लोकांनी आपला जीव गमवला होता. पुढच्या काही महिन्यात 10000 ते 20000 लोकांनी आपला जीव गमावला. 1,00,000 ते 2,00,000 लोकांना कायम स्वरुपी इजा झाल्या. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हे संकट एवढ भयानक होत की कल्पना करण ही शक्य होत नाही. 2000 जनावर मृत्युमुखी पडली. झाडांवरची पानही पिवळी होउन गळून पडली. हॉस्पीटलमधील स्टाफला या घटनेला कस सामोर जायच याच कोणतही प्रशिक्षण दिलेल नव्हत. 












