Monday, 25 May 2009
Monday, 18 May 2009
सिंग इज किंग
सिंग इज किंग
सिंग इज किंग बऱ्याच दिवसांनी भारतीय जनतेने एका पक्षाला स्वतंत्रपणे काम करण्याची मतांद्वारे अनुमती दिली आहे. भारतीय जनता घोडाबाजाराला वैतागली होती. छोटे प्रादेशिक पक्ष कशाप्रकारे सरकारची अडवणुक करायचे हे जनतेने पाहिले होते. जनतेला पुन्हा असे सरकार नको होते जे या पक्षांवर अवलंबून राहिल. जनतेने स्थैर्याला महत्त्व दिले यात वाद नाही. या विजयाचे श्रेय केवळ जनतेलाच नाही तर कॉंग्रेस पक्षालाही आहे. कॉंग्रेसचे नेते स्थिर सरकारचे महत्त्व जनतेला पटवून देण्यात यशस्वी झाले. गेल्या पाच वर्षात सरकारने जी कामे केली ती सोनिया गांधी,मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी लोकांपर्यत पोहचवली. भाजपच्या नेत्यांचा अतिआत्मविश्वासही नडला. प्रचारात वापरण्यात आलेली भाषाही लोकांना आवडली नाही.मनमोहनांना कमजोर म्हणता म्हणता त्यांचे विरोधकच कमजोर ठरले. या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला राहुल गांधी यांनी. राहुलचा जोरदार प्रचार कॉंग्रेसच्या विजयात महत्त्वाचा ठरला. "आम आदमी के बढते कदम हर कदम पर भारत बुलंद" आणि "जय हो" हे नारे मह्त्त्वाचे ठरले. राहुल गांधी यांनी अत्यंत नम्र भाषेत , सामान्य भारतीय माणसाच विचार करुन प्रचार केला. त्यांनी तरुण लोकांची एक ब्रिगेड तयार केली. कॉंग्रेसच्या या विजयाने डाव्यांचे महत्त्व संपुष्टात आले आहे. देश पुन्हा एकदा स्थिरतेकडे चालला आहे. याचा फायदा देशाला निश्चितच होइल.
| पक्षीय बलाबल | |
| भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस | 206 |
| भारतीय जनता पार्टी | 116 |
| समाजवादी पार्टी | 23 |
| बहुजन समाज पार्टी | 21 |
| तृणमुल कॉंग्रेस | 19 |
| द्रवीड मुन्नेत्र कळघम | 18 |
| पक्षीय बलाबल - महाराष्ट्र | |
| भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस + | 25 |
| भारतीय जनता पार्टी+ | 20 |
| पक्षीय बलाबल - उत्तर प्रदेश | |
| भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस + | 26 |
| भारतीय जनता पार्टी + | 10 |
| समाजवादी पार्टी | 23 |
| बहुजन समाज पार्टी | 20 |
Labels:
महाराष्ट्र,
माझा भारत,
राजकारण,
राष्ट्रवाद
Subscribe to:
Comments (Atom)









