Saturday, 12 July 2008

पदवीला प्रवेश घेताना....

पदवीला प्रवेश घेताना....

विजयः- निकाल जाहीर झालेत अजूनही कुठे प्रवेश घ्यायचा हे नक्की नाही. तीन चार ठीकाणी अर्ज केलेत. बघूया काय होते ते?
अजयः- हो मी पण अर्ज केलेत. मला थोडे मार्क्स कमी आहेत. पण प्रयत्न चालू आहेत.


सध्या हे संवाद सर्रास ऎकायला मिळतील. काही मुले आणि पालक या प्रयत्नांना कंटाळतात. तर काही कमी मार्क्समुळे प्रवेशापासून वंचीत होतात. याच काळात पेपरमध्ये आकर्षक जाहिरातींचा सुकाळ असतो. अनेक कधीच नाव न ऐकलेल्या पदव्यांच्या जाहिराती वृत्तपत्रांत दररोज येत असतात. अनेकदा पालक या जाहिरातींनी भूलून जातात. नोकरीची पक्की हमी, अद्ययावत वर्ग, अनुभवी प्राध्यापक, अनेक विद्यार्थ्यांना फायदा ही ठरलेली वाक्ये असतात. अनेकदा पालक या जाहिरीतींमुळे फसतात. कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना तो अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहे याची खात्री करुन घ्यावी. ज्या संस्थेत आपण प्रवेश घेणार असाल त्या संस्थेला विद्यापीठाची मान्यता आहे याची खात्री करुन घ्या. केवळ आकर्षक जाहिरातींना न भूलता त्या पदवीच्या उपयुक्ततेची योग्य चौकशी करा. स्वतः संस्था पाहून या आणि तज्ञ प्राध्यापकांचा जरुर सल्ला घ्या. जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या.

Tuesday, 1 July 2008

म.टा.ने पुढे केला मदतीचा हात.

म.टा.ने पुढे केला मदतीचा हात

समाजात अशी अनेक मुले असतात ज्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या या मुलांसाठी म.टा.ने मदतीचा हात पुढे केला आहे. अशा हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांची यशोगाथा म.टा. प्रसिध्द करणार आहे. म.टा.ने हे अभिनंदनिय पाउल उचलले आहे. समाजसेवा करणाऱ्या सर्व व्यक्तींनी आणि संस्थांनी याची दखल घ्यावी.

मटा हेल्पलाइन

ShareThis

Visitors Worldwide

free counters