Wednesday, 29 February 2012

पु ल देशपांडे - वस्त्रहरण भाग २

Pula_Vastraharan1.wmv

Thursday, 23 February 2012

तेरेखोल

तेरेखोल [ वेंगुर्ला तालुका आणि पेडणे तालुका उत्तर गोवा ] एकच गाव पण दोन तालुक्यात ? आश्चर्य वाटतंय ना? मित्रांनो तेरेखोल हा गाव वेंगुर्ला तालुक्यात येतो पण याच गावातील तेरेखोल किल्ला मात्र पेडणे तालुक्याचा (उत्तर गोवा जिल्हा) भाग आहे. १७ व्या शतकात सावंतवाडी संस्थानचे महाराज खेम सावंत भोसले यांनी तेरेखोल किल्ला बांधला. १७६४ साली हा किल्ला पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. तेरेखोल गाव जरी वेंगुर्ला तालुक्यात येत असलं तरी हा किल्ला मात्र सध्या गोवा सरकारच्या ताब्यात आहे. सध्या किल्यात एक आलिशान हेरिटेज हॉटेल बांधण्यात आल असून किल्यात प्रवेश निवडक लोकांनाच मिळतो. तेरेखोल पाहण्यासाठी वेंगुर्ला आणि सावंतवाडी बसस्थानकावरून बसेस उपलब्ध आहेत. गोव्यातून जाण्यासाठी केरी मार्गे यावे लागेल. विशाल तेरेखोल नदी पार करण्यासाठी फेरी बोट उपलब्ध आहेत. केरी (गोवा) - तेरेखोल आणि पाल्ये (गोवा) - आरोंदा (वेंगुर्ला) फेरीबोट सेवा सतत सुरु असते. केरी तून म्हापसा आणि पेडणे बसेस सतत उपलब्ध असतात.


जवळची प्रेक्षणीय स्थळे
१) तेरेखोल नदी
२) तेरेखोल किल्ला
३) रेडी गणपती मंदीर
४) टाटा इस्पात कंपनी रेडी
५) आरोंदा
६) तेरेखोल हेरिटेज रिसोर्ट, गोवा सरकार
७) तेरेखोल बीच
८) शिरोडा बीच
९) आरवली वेतोबा (दक्षिण काशी)
१०) उभादांडा बीच
११) वेंगुर्ला
१२) केरी बीच (पेडणे)


फेसबुकवरील खोटा प्रचार

हा एक नवीन खोटा प्रचार. हा फोटो बघून मला धक्काच बसला. एखाद्या पक्षाविरुद्ध प्रचार करताना लोक एवढ्या खोट्या गोष्टी पसरवतील आणि त्याच्यावर आपले फेसबुककर एवढा विश्वास ठेवतील अस स्वप्नातही वाटल नव्हत. मित्रांनो डोळे झाकून शेअर करण सोडा. आपण नक्की काय शेअर करतोय याचा विचार करा. सत्यता पडताळून पहा. किती दिवस तुम्ही फसत राहणार. स्वतःच्या डोक्याचा वापर करा, एकाच संकुचित विचारधारेला वाहून घेवू नका. त्या ऐवजी डोळे उघडून जगाकडे पहा. मुद्देसूद टीका करणे वेगळ आणि टिंगलटवाळी, विकृत प्रचार करणे वेगळ. आज निदान माझ्या दहा मित्रांच्या Wall वर ही पोस्ट मला दिसली. सत्य हे आहे की लुईस ब्रेल हा कोणी इटालियन राजा नसून तो जगप्रसिद्ध ब्रेल लिपीचा जनक आहे. ब्रेल लिपीचा वापर अंध लोक लिहिण्या-वाचण्यासाठी करतात. पेशाने तो एक प्राध्यापक आणि संगीतकार होता. त्याचा जन्म आणि मृत्यू दोन्ही फ्रांस या देशात झाले. ब्रेलच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी म्हणजे १८५४ मध्ये फ्रांसने ब्रेल लिपीचा अधिकृतपणे स्वीकार केला. १८७३ च्या अंध शिक्षकांच्या जागतिक परिषदेनंतर ब्रेल लिपीचा प्रसार मोठया प्रमाणात युरोपात झाला. १९१६ मध्ये अमेरिकाने ब्रेल लिपीचा स्वीकार केला आणि १९३२ मध्ये इंग्लिश भाषेकरिता ब्रेल लिपी ठरविण्यात आली. मानवतेला फार मोठ योगदान देणाऱ्या ब्रेलची दखल जगातल्या सर्वच देशांनी घेतली. युरोपियन संघाने दोन विशेष नाणी चलनात आणली. अमेरिकेने एक डॉलरच्या नाण्यावर ब्रेलची दखल घेतली. बेल्जिअम, ईराण, चीन, इटली या देशांनीही ब्रेलचा फोटो असलेली नाणी चलनात आणून ब्रेलचा मरणोपरांत सन्मान केला. २००९ साली लुईस ब्रेल यांच्या २०० व्या जयंतीचे औचित्य साधून भारत सरकारनेही दोन रुपयाचे नाणे चलनात आणले. तोच हा फोटो. त्याचा वापर काही विकृत लोक प्रचारासाठी करत आहेत. कृपया जागे व्हा आणि अश्या समाजासाठी स्वत: आयुष्य वाहिलेल्या लोकांबद्दल खोटी माहिती पसरविणाऱ्या पोस्ट शेअर करू नका.

Wednesday, 8 February 2012

दुटप्पीपणा नको ..

मायावतींनी अमेठीच नाव बदलून छत्रपती शाहूमहाराज नगर अस ठेवल आहे. मात्र कॉंग्रेसला अजूनही हे नाव मान्य नाही. कितीही नाव बदला लोक अमेठीला अमेठी म्हणूनच ओळखतील अशी दर्पोक्ती काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केली होती. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा पुढाकार करणाऱ्या कॉंग्रेसचे हे दुटप्पी धोरण कळत नाही. महाराष्ट्रात शाहू महाराजांचा आदर्श डोळयासमोर ठेवणाऱ्या कॉंग्रेसचा शाहू महाराजांच्या नावाचा एवढा विरोध का?? उत्तरप्रदेश मध्ये कॉंग्रेस प्रादेशिक राजकारण करत आहे हे खर आहे पण मग डी.एम.के , मनसे आणि युपी कॉंग्रेस मध्ये फरक तो काय?? खर तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसने राष्ट्रीय एकात्मतेचे आणि समानतेचे प्रतिक असलेल्या शाहू महाराजांचा आदर करत अमेठीचे बदललेले नाव स्वीकारले पाहिजे होते.

Wednesday, 1 February 2012

अती घाई संकटात नेई .......

स्टार माझा झिंदाबाद


ShareThis

Visitors Worldwide

free counters