Saturday, 22 August 2009

गणपती बाप्पा मोरया

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. गणपती बाप्पा मोरया...

Monday, 17 August 2009

माहितीपर संकेतस्थळे भाग - 14

माहितीपर संकेतस्थळे भाग - 14
नवी वेबसाइट

मित्रांनो, गेले काही महिने मी माझ्या पर्सनल वेबसाइटवर काम करत होतो. ही वेबसाइट एक ऑगस्टला पुर्ण झाली. माझ्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हावा हा माझा प्रयत्न आहे. तुम्हीही या वेबसाइटला भेट द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

वामन परूळेकर - येथे क्लिक करा.

धन्यवाद.

वामन राधाकृष्ण परुळेकर,
अधिव्याख्याता,
फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅंड टेक्नॉलॉजी ,(मुंबई विद्यापीठ),
रत्नागीरी.

शाहरुख खान

शाहरुख खान यांचा जो अपमान एका अमेरीकन विमानतळावर झाला त्यावरुन बरेच वादळ निर्माण झाले होते. गेले दोन दिवस एकच विषय बऱ्याच वाहिन्यांनी चघळला असेल. अनेक ब्लॉगर्सनी तर शाहरुखलाच दोषी धरलय. म्हणे या विषयाचा खुपच बाउ केला गेला. अमेरीकन नागरीकाला इतर देशात अशी वागणूक मिळाली असती तर? अमेरीका गप्प बसल असत का? एका विशेष आडनावामुळे त्याला ही वागणूक दिली गेली आहे का ? हा एक वादाचा विषय आहे. तस असेल तर ते दुर्भाग्यपुर्ण आहे.

मागे न्युयॉर्क चित्रपटात असाच एक विषय हाताळला होता. सगळ्याच आशियाइ लोकांना एकाच चष्म्यातून बघण्याचा अमेरीकन दृष्टीकोन चुकीचा आहे यात शंकाच नाही. हा समज बदलण्यासाठी भारतीय सरकारनेही प्रयत्न करावेत. केवळ एकसारखे दिसण हा काही गुन्हा होउ शकत नाही. सुरक्षेसाठी तपासणी समजता येइल पण त्यासाठी दोन-दोन तास ताब्यात घेण्याची गरज नाही.

Thursday, 13 August 2009

भारतीय संघराज्याच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा

भारतीय संघराज्याच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा. दोन दिवसानंतर आपण नव्या युगात प्रवेश करु. या निमित्ताने गेल्या वर्षी सुरु केलेली "स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे" ही लेखमाला पुर्नप्रकाशीत करत आहे. धन्यवाद.

स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे (भाग-1)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

जन्म - २३ जुलै,१८५६ -- मृत्यू - १ ऑगस्ट, १९२०
स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा करणारे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.

टिळकांनी बंगालच्या फाळणीविरूद्धचा लढा,होमरूल चळवळ,लखनौ करार यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. केसरी , मराठा सारखी वृत्तपत्रे स्वातंत्र्य लढयात महत्त्वपूर्ण ठरली.
टिळकांना साहित्यातही रुची होती त्यांनी लिहीलेली ग्रंथसंपदा.
>आर्यांचे मूळ वसतीस्थान
>ओरायन
>गीतारहस्यस्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे (भाग-2)
महात्मा मोहनदास करमचंद गांधी

जन्म - ऑक्टोबर २, १८६९ -- मृत्यू - जानेवारी ३०, १९४८

महात्मांचा जन्म ऑक्टोबर २, १८६९ या दिवशी गुजरात राज्यातील पोरबंदर शहरात झाला होता. गांधींनी इंग्लंडला कायद्याचा अभ्यास करुन बॅरिस्टर ही पदवी मिळवली. दक्षिण आफ्रीकेत त्यांनी वर्णव्देषा विरुध्द दिर्घकालीन लढा दिला.

भारतात परतल्यावर ते स्वातंत्र्य लढयात सक्रीय झाले. मिठ सत्याग्रह,दांडी यात्रा,विदेशी हटाव,स्वदेशी जागरण,भारत झोडो ही ऎतीहासिक आंदोलने बापुंनी उभारली. भारतात असलेल्या अस्पृश्यता निवारणा साठी त्यांनी प्रयत्न केले.

महात्मा गांधी हे ज्या महात्मा या उपाधीने ओळखले जात ती उपाधी त्यांना रविंद्रनाथ टागोरांनी दिली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले. जानेवारी ३०, १९४८ ला नथुराम गोडसे या व्यक्तीने महात्मा गांधींची गोळ्या घालुन हत्या केली. आणि संपूर्ण भारत दुःखाच्या महासागरात लोटला गेला.....

श्रीकृष्ण जयंती

श्रीकृष्ण जयंती

सर्व वाचकांना श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाल्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. यावर्षी सणावर स्वाइन फ्लुच सावट आहे. पण घाबरुन जाण्यासारखे काही नाही. सर्व ती काळजी घेउन सण साध्या पद्धतीने जरुर साजरा करा.

सर्वांना शुभेच्छा.

ShareThis

Visitors Worldwide

free counters